
त्रिपुरामध्ये मुस्लीम भावांसोबत क्रूरता होत आहे,” असे राहुल गांधी कळवळून म्हणत आहेत. पण, प. बंगाल आणि केरळ, काश्मीरमध्ये हिंदूंना निवडून निवडून ठार मारले गेले, तेव्हा राहुल गांधी कुठे होते? त्रिपुरामध्ये जे काही घडत आहे त्याचा थेट आरोप राहुल गांधी हिंदूंवर कसा काय करू शकतात? मनातली हिंदूद्वेषाची घाण ते वेळोवेळी अशी बाहेर काढत असतात. राहुल गांधी आणि त्यांचे जे कोणी ‘थिंक टँक’ किंवा बोलवते धनी आहेत ते हे काही विनोदाने म्हणत नसतात. त्यांना तसे म्हणून समाजात एक किंतु-परंतु उभा करायचा असतो. आताही त्रिपुरातील मुस्लीम बांधवांचा कळवळा दाखवून त्रिपुरात निरपराध मुसलमानांना हिंदू मारत आहेत, असा संदेश देशभर द्यायचा आहे का? राहुल गांधींना दया कधी येते? त्यांना केवळ भाजपशासित राज्यातील दुर्घटनांचीच दया येते. त्यांच्यातील माणूसकी वगैरे अगदी उफाळून येते. उत्तर प्रदेशातील हाथरसच्या भगिनीचा मृत्यू दुर्दैवीच होता. पण, तिथे जाऊन तिची जात शोधून त्यावर जातीवरून विलाप करणारे राहुल आणि त्यांची बहीण प्रियांकाच होती. जर ती भगिनी वाल्मिकी समाजाची नसती तर? जर तिथे भाजपचे राज्य नसते तर? तर प्रश्नच नाही. राहुलबाबांनी त्या घटनेबद्दल ब्रही उच्चाराला नसता. दुसरीकडे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे राज्य आहे. साकीनाक्यामध्ये एका समाजभगिनीची दुर्दैवी हत्या झाली. पूजा, दिशा, हिरन, सुशांत देवाघरी कसे गेले? पण, राहुल यांना दया आलेली कुणालाही दिसली नाही. राहुल यांची दया आणि करुणा म्हणजे राजकीय ढोंग आहे. वायनाडचे ते खासदार आहेत. तर त्या वायनाडमधल्या मुस्लीम मतदारांना खूश करण्यासाठी राहुल यांना त्रिपुरातील मुस्लिमांचा पुळका आला आहे. बाकी हिंदूबहुल क्षेत्रात निवडणुका असल्या की, जानवं आणि गंध लावून आपण हिंदू त्यातही ब्राह्मण आहोत, असे म्हटले की भोळे हिंदू खूश होतात, असे राहुल यांना वाटत असते. या असा वाटण्याचा आविष्कार ते वेळ येईल तेव्हा करतच असतात. मग लोक मंदिरात मुलींना छेडण्यासाठी जातात, असे म्हणत ते स्वत: मंदिराच्या वार्या करतात. असो. राहुल यांना जशी त्रिपुरातील लोकांची दया आली, त्यांच्या आईचा आतला आवाज जितका खोटा आहे, तितकीच राहुल यांची दया, करुणाही खोटीच आहे, हे नक्की.
माणूस कितीही मोठा असला तरी कौटुंबिक स्तरावर पालक म्हणून त्याची काही कर्तव्य असतात. ती कर्तव्यं चुकली की, त्याचे आयुष्यही चुकतेच. पण, या चुकीला दुरुस्त न करता त्या चुकीचा उत्सव साजरा करणारे शाहरूख-गौरी दाम्पत्य म्हणजे आजच्या पालकत्वासमोरचा मोठा प्रश्न आहे. ‘आपला तो बाब्या, दुसर्याचे ते कार्टे’ अशी म्हण आहेच; पण गुन्हेगाराची भलामण करण्याची आपली तरी प्रथा पंरपरा नव्हती आणि नाही. पण, ‘उद्धवा अजब तुझे सरकार’ असल्यामुळे सगळे निमूट चालले आहे. आर्यन खान आणि गल्लीबोळातील नशा करणार्या तमाम युवकांना सुधारण्याची संधी मिळायलाच हवी. पण, ती कशी मिळणार? त्यांच्या गुन्ह्यांना पाठीशी घालून? आर्यन खान क्रूझ प्रकरणातील कायदेशीर खाचाखोचा कायदेतज्ज्ञ जाणोत. पण, एक समाजशील नागरिक म्हणून वाटत राहते, आर्यनच्या ऐवजी दुसरा कोणी असता तर? आजही गल्लीबोळातली निष्पाप पोरं ट्रायल केसमध्ये सडत आहेत, जामीन मिळणे तर दूरच. ग्ाुन्हा कबूल करून न केलेल्या गुन्ह्याची सजा भोगून टाकावी, इतपत त्यांची मानसिकता होते. या हजारो, लाखो युवकांबद्दल कोण पुढे येणार? यातले कित्येक जण निर्दोष असतात आणि अजाणतेपणे गुन्ह्यात अडकलेले असतात. पण, यांच्यावर गुन्हा दाखल झाला रे झाला की, त्यांचे पालक जगणेच सोडून देतात. मुलगा सुटून आल्यावर ते जल्लोष करत नाहीत. कारण, मुलगा गुन्हेगार असेल म्हणून तर त्याला सजा झाली, असा त्यांचा कायद्यावर विश्वास असतो आणि पोलीस प्रशासनाबद्दल त्यांच्या मनात भीती, दरारा असतो. आर्यन खानची वकिली करताना मंत्री नवाब मलिक आणि महाविकास आघाडीचे कौशल्य देशाने पाहिले. आता या नवाब आणि सहकारी मंत्र्यांनी आत्महत्या करणार्या शेतकर्यांचे आणि कोरोनाकाळात सुविधांअभावी तडफडून मरणार्या निष्पाप जीवांचेही वकीलपत्र घ्यावे. त्यामुळे त्यांच्या दुर्दैवाविरोधात वकिली करायला महाविकास आघाडीचे नेतेमंडळी पुढे येणारच नाहीत. कारण, हे कोरोनाग्रस्त किंवा मरणारे शेतकरी श्रीमंत नव्हते ना? तूर्तास नवाब आणि मंत्र्यांचे संशोधन कार्यही अफलातून आहे. आपल्या सरकारमधील लापता गृहमंत्री कुठे आहेत? यावर त्यांनी संशोधन करावे. बाकी आर्यन मुबारक!
9594969638