
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे या संस्थेच्या संशोधन विभागामार्फत लोणी काळभोर, पुणे येथे मांग-गारुडी समाजास समाज कल्याण विभागाच्या योजना, जातपडताळणी, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागांच्या विविध योजना, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था,(बार्टी), पुणे मार्फत राबविण्यातयेणाऱ्या विविध योजना, स्पर्धा परिक्षा, आय.बी.पी.एस. व पोलीस वमिलीटरी भरती पूर्व प्रशिक्षण, कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येणारे प्रशिक्षण, यु.पी.एस.सी.प्रशिक्षण व संविधान याविषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.मांग-गारुडी समाज बांधवांनी सदर कार्यशाळेस दिनांक 22 जुलै 2025 रोजी सकाळी 10:00 वाजता “काळभोरलॉन्स” सोलापूर-पुणे महामार्ग, रिलायन्स पेट्रोल पंपासमोर, पुणे येथे उपस्थित राहण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.