चिंता वाढली; दापोलीत पाच कावळे सापडले मृतावस्थेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2021
Total Views |

bird flue_1  H


राज्यात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव नाही

मुंबई (प्रतिनिधी) - आज सकाळी दापोली डम्पिंग गाऊंड परिसरात पाच कावळे मृतावस्थेत आढळून आले. या पक्ष्यांचे नमुने 'बर्ड फ्लू'च्या तपासणीसाठी दापोली पशुसंवर्धन विभागाकडून पुण्याला पाठविण्यात येणार आहेत. या तपासणीनंतर पक्ष्यांच्या मृत्यूचे कारण समजेल. दरम्यान देशातील पाच राज्यांमध्ये 'बर्ड फ्लू'ची साथ पसरली असून महाराष्ट्रात या साथीने शिरकाव केलेला नाही. 

गेल्या आठवड्यात हिमाचल प्रदेशातील पाॅंग डॅम तलाव क्षेत्रात साधारण १,८०० स्थलांतरित पक्षी मृतावस्थेत आढळले. त्यामधील बरेच पक्षी बार हेडड गिज म्हणजेच पट्टकादंब प्रजातीचे होते. या पक्ष्यांचे नमुने 'H5N1 इन्फ्लूएन्झा व्हायरस' म्हणजेच 'बर्ड फ्लू'ने संक्रमित झाल्याचे समोर आले आहे. यापूर्वीच केरळ, राज्यस्थान, हरियाणा आणि मध्य प्रदेश राज्यात या व्हायसरने प्रवेश केला आहे. हरियाणामध्ये कुक्कुटपालनातील एक लाख पक्ष्यांच्या 'बर्ड फ्लू'मुळे मृत्यू झाला आहे. तर राजस्थान, मध्यप्रदेशमध्ये मृताअवस्थेत आढळलेल्या कावळ्यांमध्ये आणि केरळमध्ये काही बदक बर्ड फ्लूमुळे संक्रमित असल्याचे उघड झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, H5N1 इन्फ्लूएन्झा व्हायरस हा पक्ष्यांमधून माणसांमध्ये संक्रमित होऊ शकतो. त्यामुळे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या वन्यजीव कक्षाने यासंदर्भात परिपत्रक काढून राज्याच्या वन विभागाला सर्तक राहण्याचे आदेश दिला आहे. 

यापार्श्वभूमीवर आज सकाळी दापोलीतील डम्पिंग गाऊंड परिसरात पाच कावळे मृतावस्थेत आढळले. त्यानंतर दापोली नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी मृत पक्ष्यांना ताब्यात घेऊन त्यांना दापोली पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले. या पक्ष्यांच्या नमुन्यांना पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. दरम्यान काल ठाण्यातील विजय वाटिका गृहसंकुलात १५ पक्षी मृतावस्थेत आढळले होते. त्यामध्ये काही कावळे आणि पाणबगळ्यांचा समावेश होता. या पक्ष्यांचे नमुनेही पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविण्यात आले होते. मात्र, त्यांचा बर्ड फ्लूचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे. 

@@AUTHORINFO_V1@@