डोंबिवलीत फडकणार 150 फूट उंच तिरंगा

    05-Jan-2021
Total Views | 99
डोंबिवलीत फडकणार 150 फूट उंच तिरंगा
 
 

rashtradhawaj photo_1&nbs 

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘ग’ प्रभाग अंतर्गत दत्तनगर येथील ‘संकल्पतीर्थ’ येथे स्थानिक नगरसेवक राजेश मोरे आणि नगरसेविका भारती मोरे यांच्या नगरसेवक निधीतून 150 फूट उंचीवर भारतीय तिरंगा ध्वज उभारण्यात येणार आहे.
 
 
या प्रकल्पाचे भूमीपूजन समारंभ रविवारी पार पडला. या ध्वजाची उभारणी स्वा. वि. दा. सावरकर उद्यान याठिकाणी होत आहे. प्रजासत्ताक दिनी याठिकाणी ध्वजाचे ध्वजारोहण होणार आहे.
 
 
राजेश मोरे म्हणाले, दिल्ली येथून केंद्रीय गृहमंत्री कार्यालयातून विशेष परवानग्या आणाव्या लागतात. जिल्हाधिकारी कार्यालयाला आवश्यक त्या सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. तसेत दिल्ली येथे मंजूरीचे काम अल्पावधीत करण्यात आली. अखेर तीन दिवसांत या प्रकल्पाला मंजूरी मिळाली. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच भारताचा ङोंडा डोंबिवलीत फडकणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
----------------------------------------------------------------------- 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121