मनेसे नेते संदीप देशपांडे यांना रेल्वे पोलिसांकडून जामीन मंजूर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Sep-2020
Total Views |

MNS_1  H x W: 0
कल्याण : सविनय कायदेभंग आंदोलन प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी कारवाई केलेल्या मनसे नेते संदीप देशपांडे यांना रेल्वे सहाय्यक पोलिस आयुक्तांनी जामीन मंजूर केला आहे. देशपांडे यांच्या वकीलांनी मंगळवारी जामीन सादर केला होता. सामान्य रेल्वे प्रवाशांकरिता रेल्वे गाडयांची सुविधा सुरू करावी या मागणीसाठी देशपांडे यांनी तीन कार्यकत्र्यासह कजर्त ते शेलू या रेल्वे स्थानकाच्या दरम्यान प्रवास केला होता. या प्रकरणी रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने देशपांडे यांच्यासह तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.
 
 
मागील आठवड्यात देशपांडे यांना कल्याण रेल्वे न्यायालयात सादर करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना १५ हजारांचा जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र रेल्वे पोलिसांनी देशपांडे यांच्या विरोधात १०७ कलमान्वये कारवाई केल्याने आज पुन्हा रेल्वे सहाय्यक पोलिस आयुक्तांसमोर हजर राहावे लागले. देशपांडे यांच्यासह तीन कार्यकर्त्यांच्या जामीनाची तयारी मनसेने केली होती. मनसेच्या वतीने २० हजार पगार असलेले आठ जामीनदार तयार ठेवले होते. मात्र ऐनवेळी रेल्वे पोलिसांनी देशपांडे यांच्या जामीनीकरिता क्लास वन अधिकारी लागतील असे सांगितले. त्यावेळी मनसेच्या वतीने तीन क्लास वन अधिकारी व एक पीएचडी होल्डर जामीनदार सादर केले. पीएचडी होल्डर जामीनदाराने देशपांडे यांना जामीन दिला तर अन्य तीन क्लास वन अधिकाऱ्यांनी तीन कार्यकत्र्याना जामीन दिला.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@