राम मंदिर झालं आता 'राफेल'वरून पवारांची टीका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jul-2020
Total Views |

sharad pawar_1  




मुंबई :
फ्रान्सहून भारताकडे रवाना झालेले पाच राफेल लढाऊ विमान आज २९ जुलै रोजी भारताला मिळणार आहेत. सुमारे ७०००किमी प्रवास करुन राफेल विमानांची पहिली बॅच आज अंबालाच्या एअरफोर्स स्टेशन इथे पोहोचतील. राफेल विमानं कोणत्याही हवामानात एकाच वेळी अनेक कामे करण्याच्या क्षमतेमुळे मल्टिरोल फायटर एअरक्राफ्ट म्हणूनही त्याची ओळख आहे. त्यामुळे ही विमाने भारताच्या हवी ताफ्यात आल्याने भारतीय हवाई दलाची ताकत वाढणार आहे. मात्र राफेलमुळे हवाई दलाची ताकद वाढेल, पण ते गेमचेंजर ठरणार नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.




सीएनएन न्यूज18 लोकमत या मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना ते म्हणाले, भारतने हवाई दलात राफेल विमाने सामिल केली ही नक्कीच चांगली बाब आहे. राफेलच्या ताफ्यात सामिल होण्यानं नक्कीच हवाई दलाची ताकद वाढेल. पण ते गेमचेंजर ठरणार नाही. कारण राफेलच्या हवाई दलाच्या ताफ्यात सामिल होण्याने  चीनला कदाचित कोणतीही काळजी वाटणार नाही. ते आपल्यापासून खुप म्हणजे खुपच पुढच्या टप्प्यावर आहेत. आपल्यात आणि त्यांच्यात कोणत्याही प्रकारची तुलना करता येणार नाही, असे शरद पवार म्हणाले. तसेच जर भारताने सुरक्षेच्या दृष्टीने १० गोष्टी केल्या तर चीन १ हजार गोष्टी करेल. चीन आणि भारतात एवढी तफावात आहे. राफेलच्या येण्याने चीनला त्याची काळजी वाटेल असे मला वाटत नाही. भारताने राफेल हवाई दलात सामावून घेतले आहे हे चांगले आहे. त्यामुळे हवाई दलाची ताकद नक्कीच वाढणार आहे. पण ते गेमचेंजर ठरेल असे वाटत नाही, असेही म्हंटले आहे. 



राफेल लँडिंगच्या पार्श्वभूमीवर प्रशासन हाय अलर्टवर


दरम्यान, राफेल विमानांच्या लँडिंगच्या पार्श्वभूमीवर प्रशासन हाय अलर्टवर आहे. अंबालाला लागून असलेल्या ४ गावांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांना एकत्र येण्यास मनाई केली गेली आहे. तसेच नागरिकांना घराच्या गच्चीवर येण्यासही बंदी घालण्यात आली आहे. विमानाच्या लँडिंगच्या वेळी छायाचित्रण आणि व्हिडिओग्राफीवरही बंदी आहे, अशी माहिती अंबाला डीएसपी (वाहतूक) मुनीश सहगल यांनी दिली.

@@AUTHORINFO_V1@@