I फॉर India ; 'I Phone 11'ची निर्मिती भारतात होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jul-2020
Total Views |


i phone_1  H x



नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या 'मेड इन इंडिया'च्या उपक्रमात योगदान म्हणून अँपलने चेन्नईच्या फॉक्सकॉन प्लांटमध्ये 'आयफोन ११'च्या फ्लॅगशिप उपकरणांची निर्मिती सुरू केली आहे. उल्लेखनीय म्हणजे, अँपलने प्रथमच भारतात टॉप-ऑफ-द-लाइन मॉडेल तयार केले, अशी माहिती इकॉनॉमिक्स टाइम्सने दिली आहे. चीनच्या कुरापतींमुळे देशात चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणीने जोर धरलेला असतानाच अॅपलच्या या निर्णयानं चीनलाही मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे. वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी ट्विटरवरुन ही बातमी जाहीर केली.





ते म्हणतात , “मेक इन इंडियाला महत्त्वपूर्ण बूस्ट ! अँपलने भारतात आयफोन ११ ची निर्मिती सुरू केली असून देशात प्रथमच टॉप-ऑफ-द-लाइन मॉडेल आणले जात आहे." याव्यतिरिक्त बंगळुरू येथील विस्ट्रोन प्लांट येथे आयफोन एसइच्या निर्मितीचा विचार सुरू असल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे. केंद्राकडून प्रोडक्शन लिंकेड इन्सेन्टिव्ह(PLI) स्कीमचा फायदाही अॅपलला मिळणार आहे. त्यांच्या या निर्णयामुळे देशातील अॅपल उप्तादनाच्या स्थानिकीकरणातही वाढ होणार आहे. याशिवाय चीनबाहेर अॅपलला त्यांच्या उप्तादनाचे जाळे पसरवता येणार आहे. २०१७मध्ये अँपलने बेंगळुरू प्लांटमध्ये अँपल आयफोन एसई २०१६ चे डोमेस्टीक उत्पादन सुरू केले होते.


आयफोनच्या या प्रकल्पाचा भारतीय खरीददारांना मोठा फायदा होणार आहे. अॅपलच्या या निर्णयामुळे त्यांचा २२% आयात कर वाचणार आहे. ईटीच्या अहवालात म्हटले आहे की आयफोन ११चे उत्पादन भारतात टप्प्याटप्प्याने केले जाईल.भारतात तयार होणाऱ्या या आयफोन ११ची निर्यातही केली जाऊ शकते. त्यामुळे चीनवर आता अधिक विसंबून राहणे कमी करता येईल,''असे उद्योग क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'इकॉनॉमिक टाईम्स'ला सांगितले. अँपलचा सर्वात मोठा पुरवठादार असलेल्या फॉक्सकॉनने पुढील काही वर्षांत तामिळनाडूमधील प्रकल्प वाढवण्यासाठी १अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. अँपलकडे सध्या फॉक्सकॉन, विस्ट्रोन आणि पेगाट्रॉन हे आयफोन मॉडेल्ससाठी तीन मोठे पुरवठादार आहेत. भविष्यात केवळ फॉक्सकॉनच नाही तर पेगाट्रॉनचीही भारतात मोठी गुंतवणूक करण्याची योजना आहे.
@@AUTHORINFO_V1@@