सोसायटीत येणाऱ्या प्रत्येकाची थर्मल स्क्रीनिंग करावी लागणार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jul-2020
Total Views |
Thermal screening_1 


कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्तांचा निर्णय!


ठाणे : ठाणे शहरांमधील सर्व गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आता यापुढे पल्स ऑक्सीमीटर आणि थर्मलगनच्या साहाय्याने तपासणी करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी घेतला आहे.


ठाणे शहरात कोरोना कोविड १९ मुळे बाधित झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असून सद्यस्थितीत प्रत्येक प्रभाग समिती क्षेत्रात कोविड १९ विषाणूचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा हा संसर्ग रोखण्याकरिता महापालिकेच्या माध्यमातून अनेकविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील गृहनिर्माण सोसायटीमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची पल्स ऑक्सीमीटर आणि थर्मल गनच्या साहाय्याने तपासणी करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी घेतला आहे.


सोसायटीचे आवारात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची सोसायटीद्वारे पल्स ऑक्झीमीटर आणि थर्मल गनच्य साहाय्याने २४ तास तपासणी करण्यात यावी. पल्स ऑक्झीमीटर तपासणी ही दिशादर्शक तपासणी असून ज्या व्यक्तीची ऑक्सीजन सॅच्युरेशन लेव्हल ही ९४ च्या खाली असल्यास त्यास त्वरीत पुढील तपासणी करण्याकरिता महानगरपालिकेची फिव्हर क्लिनिक अथवा खासगी डॉक्टर्स यांचेमार्फत तपासणी करुन घेण्याबाबतची सूचना देण्यासंदर्भात सूचित केले आहे.


त्याचबरोबर सोसायटतील ज्येष्ठ व्यक्ती, १० वर्षाखालील मुले किंवा इतर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्ती यांची पल्स ऑक्झीमीटरद्वारे तपासणी करुन त्यांची दैनंदिन नोंद सोसायटीचे स्तरावर ठेवण्यात यावी. या अनुषंगाने ज्या व्यक्तींची ऑक्सीजन सॅच्युरेशन लेव्हल ही ९४ किंवा त्या खाली आल्यास अशा व्यक्तींची डॉक्टरांच्या सल्ल्याने तात्काळ स्वॅब टेस्ट करुन घेण्याबाबत सूचित करण्याबाबत स्पष्ट केले आहे.


दरम्यान, सोसायटीतील कोविड व्यतिरिक्त इतर आजारांकरिता रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांबाबातची माहिती कृपया महापालिकेस कळवावी. जेणेकरुन केवळ कोविड१९ च्या अनुषंगाने माहितीचे विश्लेषण करुन वैद्यकीय विभागामार्फत पुढील मदत उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर सोसायटीचे आवारात सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाईल व प्रत्येक व्यक्ती मास्कचा वापर करेल याबाबतची दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.


याबाबत सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या स्तरावर त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व गृहनिर्माण सोसायट्यांना मार्गदर्शक सूचना असेलेली पत्रे पाठविण्याबाबत सूचित करण्यात आले आहेत.




@@AUTHORINFO_V1@@