कलाकार सांगणार पडद्यामागील धमाल किस्से!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2020
Total Views |

Kisse Bahaddar_1 &nb


स्वरंग मराठीचा नवा उपक्रम "किस्से बहाद्दर"


मुंबई : सध्या या लॉकडाऊनच्या काळात मनोरंजन क्षेत्रात प्रेक्षकांसाठी निरनिराळे उपक्रम राबवले जात आहेत. असाच एक नवा उपक्रम "स्वरंग मराठी" या नव्या वहिनीने हाती घेतला आहे. विप्लवा एंटरटेनमेंटस् आणि पॅलेट मोशन पिक्चर्स यांनी याची निर्मिती केली असून, पहिल्या भागात अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी पडद्यामागचे धमाल किस्से सांगितले आहेत. नाटकाच्या पडद्याआड, प्रयोगाच्या दरम्यान घडलेले काही किस्से रसिकांना "किस्से बहाद्दर" या नव्या कार्यक्रमामधून कळणार आहेत.


संजय मोने, शरद पोंक्षे, विजय कदम, मंगेश कदम, लीना भागवत, शर्वाणी पिल्ले, अविनाश नारकर, भार्गवी चिरमुले, श्रुजा प्रभुदेसाई, ऋतुजा बागवे, शशांक केतकर आदी मान्यवर कलाकार या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. सचिन सुरेश याने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आहे. या कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन सुश्रुत भागवत ह्यांनी केले आहे. सोमवारपासुन "स्वरंग मराठी"च्या युट्युब चॅनल व सोशल मिडिया पेज वरून  (https://www.swarang.tv/) ह्या कार्यक्रमाचे भाग दाखवण्यास सुरवात झाली आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@