'स्लोव्हेनिया' ठरला पहिला कोरोनामुक्त 'युरोपियन देश'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-May-2020
Total Views |

EU slovenia _1  




ल्युजलजाना(स्लोव्हेनिया)
: गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोना रुग्णांची आकडेवारी व देशातील एकूण परीस्थितीचा अंदाज घेता स्लोव्हेनिया देशाच्या सर्व सीमा खुल्या करण्याचा निर्णय घेतला. मागील दोन आठवड्यात दररोज सात नवीन कोरोना प्रकरणांची पुष्टी केल्यानंतर स्लोव्हेनिया हा कोरोनावर नियंत्रण मिळविणारा पहिला युरोपियन देश ठरला आहे.



गेल्या दोन आठवड्यांत अधिकाऱ्यांनी दररोज सात नवीन कोरोना रुग्णांची पुष्टी केल्यावर स्लोव्हेनियन सरकारने १४ मे रोजी उशिरा देशातील कोरोना साथीवर नियंत्रण मिळविले असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता स्लोव्हेनिया हा कोरोनावर नियंत्रण मिळविणारा पहिला युरोपियन देश ठरला. एप्रिलच्या सुरुवातीपासूनच युरोपीयन युनियनच्या इतर देशांमधून स्लोव्हेनिया येथे दाखल झालेल्या लोकांना किमान सात दिवस अलग ठेवणे बंधनकारक नसल्याचेही सरकारने एका निवेदनात म्हटले आहे.


२ दशलक्ष लोकसंख्या असणारा हा देश इटली, ऑस्ट्रिया, हंगेरी आणि क्रोएशियाच्या सीमेवर आहे. या देशात आतापर्यंत १,४६४ कोरोनव्हायरसची प्रकरणे नोंदली गेली आहेत. त्यापैकी १०३ लोकांचा या साथीत मृत्यु झाला आहे. १२ मार्च रोजी या देशाने कोरोना साथीचा फैलाव झाला असल्याचे जाहीर केले होते.


“स्लोव्हेनियाने दोन महिन्यापूर्वीच कोरोना साथीवर ताबा मिळविला होता. आज स्लोव्हेनियामध्ये युरोपमधील इतर देशांच्या तुलनेत उत्तम व दिलासादायक वातावरण आहे.” असे पंतप्रधान जनेझ जानसा यांनी १४ मे रोजी संसदेत सांगितले.


साथीच्या रोगाचा अंत म्हणजे काही उपाययोजना असतील ज्यात नागरिकांना आर्थिक मदत आणि कोरोनाव्हायरसमुळे ग्रस्त कंपन्यासमोरील आव्हाने मे महिन्याच्या शेवटी संपतील. कोरोना विषाणूच्या संसर्गाची लक्षणे असणाऱ्या परदेशी नागरिकांना मात्र अद्याप देशात प्रवेश दिला जाणार नसल्याचे सरकारने म्हटले आहे.


'मुत्सद्दी आणि मालवाहतूक करणार्‍या लोकांसह काही सूट वगळता युरोपियन संघाचे सदस्य नसलेल्या देशांतील लोकांसाठी किमान १४ दिवस अलगीकरण गरजेचे असेल. नागरिकांना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी व रोखण्यासाठी मूलभूत नियम पाळावेच लागतील, असे सरकारने सांगितले. लोकांना घरातील सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे. कमीतकमी ५ फूट अंतरावर उभे राहणे आणि सार्वजनिक ठिकाणी प्रवेश केल्यावर हात निर्जंतुक करणे आवश्यक आहे. मार्चच्या मध्यापासून स्लोव्हेनियाने सार्वजनिक वाहतूक ,अन्न व औषधांची दुकाने वगळता सर्व शाळा, क्रीडा व सांस्कृतिक संस्था, बार, रेस्टॉरंट्स, हॉटेल आणि दुकाने बंद केली होती. मात्र, २० एप्रिलपासून सरकारने लॉकडाऊन शिथिल करण्यास सुरवात केली. सार्वजनिक वाहतूक या आठवड्याच्या सुरूवातीस पुन्हा सुरू झाली. तर पुढील आठवड्यात काही विद्यार्थी शाळेत परत येतील असे सांगण्यात आले.
@@AUTHORINFO_V1@@