राहुल गांधींची रघुराम राजन यांच्यासोबत अर्थव्यवस्थेवर चर्चा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2020
Total Views |

Rahul Gandhi_1  



सत्तेचे विकेंद्रीकरण महत्त्वाचे; रघुराम राजन यांचे मत



नवी दिल्ली : कोरोना व्हायरस भारतासह जगभरात थैमान घालत असताना त्याला रोखण्यासाठी अनेक देशांना लॉकडाऊन सारखी कडक पावले उचलावी लागली. त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेसोबतच भारताच्या अर्थव्यवस्थेवरही झाला आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी अर्थव्यवस्था आणि आरोग्य क्षेत्रामधील तज्ञ मंडळींशी चर्चा केली आहे. यामध्ये आज त्यांनी भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यासोबत चर्चा केली आहे. यावेळेस त्यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारा त्यांनी रघुराम राजन यांच्याबरोबर अर्थव्यवस्थेसमोर असलेल्या आव्हानांची चर्चा केली.


रघुराम राजन यांनी विकेंद्रीकरण महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे. सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळे सर्व सामान्यांना ताकद मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे. निर्णय वेगळीकडून घेतला गेला तर तो योग्य दिशेने पुढे सरकणार नाही. आज पंचायतसारख्या संस्थांना कमी अधिकार दिले आहेत. केंद्रीकरणामुळे निर्णय लवकर राबवले जाऊ शकत नाहीत, असे मत रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे.


२४ मार्च ते १४ एप्रिल या पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊनचा देशावर अधिक परिणाम जाणवला नाही. भारतातील गोरगरिबांसाठी सुमारे ६० हजार कोटी पेक्षा अधिक रुपयांची गरज लागेल. पण भारताचा जीडीपी जवळपास २०० कोटी असताना ही किंमत खूपच कमी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्या हा प्रश्न गरिबांच्या जीवाचा असेल तर हा खर्च व्हायला हवा, असेदेखील रघुराम राजन यांनी सुचवले आहे.
@@AUTHORINFO_V1@@