राबोडी, मुंब्रा कौसाने उडवली ठाणेकरांची झोप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2020
Total Views |
Thane_1  H x W:




ठाणे शहरात आज आढळले १९ रूग्‍ण, एकुण संख्‍या १४९


ठाणे : मुंब्रा कौसा भागाने करोना ग्रस्‍ताचा आकडा वाढवण्‍याचे प्रमाण रविवारीही कायम होते, शनिवारी ८ तर आज ७ करोनाग्रस्‍त या भागातुन आढळले तर राबोडी भागात ५ रूग्‍णांची टेस्‍ट पॉझीटिव्‍ह आली हे ५ जण पालिकेच्‍या कॉरंटाईन सेंटरमध्‍ये दाखल होते त्‍यांचे चाचणी अहवाल यायचे होते आज ते आल्‍यानंतर राबोडी, वृंदावन परिसरात भितीचे वातावरण पसरले. आज शहरात एकुण १९ रूग्‍ण आढळले त्‍यामुळे शहरातील करोनाग्रस्‍तांचा आकडा १४९ वर पोहचला आहे.
 
 
ठाणे शहरातील करोनाग्रस्‍तांच्‍या संख्‍येत दिवसेंदिवस भर पडत आहे. आज दिवसभरात जवळपास १९ रूग्‍ण आढळले. या १९ रूग्‍णापैकी १२ जण हे राबोडी, मुंब्रा कौसा परिसरातील आहेत. त्‍यामुळे या दोन्‍ही भागातील नागरिकांच्‍या चिंतेत भर पडली आहे. आज दिवसभरात आढळलेल्‍या १९ रूग्‍णांपैकी राबोडीतील ५ , वागळे पडवळ नगर भागातील १, लोकमान्‍य नगर पाडा नं ३ भागातील १ तर मुंब्रा कौसा ७ रूग्‍ण आहेत उर्वरित ५ रूग्‍णांच्‍या ठिकाणाबाबत माहिती पालिका सुत्रांकडून उशिरापर्यंत उपलब्‍ध झाली नव्‍हती.
 
 
राबोडी भागात जे ५ रूग्‍ण पॉझीटिव्‍ह निघाले त्‍ यांना यापुर्वीच पालिका प्रशासनाने कॉरंटाईन केले होते त्‍यांचा तपासणी अहवाल येणे बाकी होते ते आज आले आणि हे ५ जण पॉझीटिव्‍ह असल्‍याचे समोर आले. कळवा, मुंब्रा नंतर ठाणे शहरातील वसंतविहार भागात करोना रूग्‍णांची संख्‍या काही दिवस वाढत होती आता वागळे इस्‍टेट व लोकमान्‍य नगर परिसरात देखील रूग्‍ण आढळू लागले असल्‍याने ही धोक्‍याची सुचना मानली जात आहे.
 
 
कारण वागळे व लोकमान्‍य नगर भागात मोठ्या प्रमाणावर चाळ व झोपडपट्टी भाग येतो. या भागात अनेक दिवस रूग्‍ण नव्‍हते मात्र आता गेल्‍या पाच दिवसात या भागातुन देखील रोज रूग्‍ण समोर येत आहेत. शहरातील आकडा आता दिडशेच्‍या जवळ पोहचला आहे. त्‍यामुळे पालिका हद्दीतील हॉटस्‍पॉटची संख्‍या वाढल्‍याने विकेंद्रीत स्‍तरावर काम करतांना धावपळ होणार आहे. आता कोपरी व दिवा भाग वगळता शहरातील प्रत्‍येक प्रभागात रूग्‍ण आढळून आले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@