'मरण्यासाठी मशीदच योग्य' मरकझमधील धक्कादायक ऑडिओ व्हायरल

    01-Apr-2020
Total Views | 495


markaj_1  H x W



नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या प्रादुर्भावाचे केंद्रस्थान ठरलेल्या निजामुद्दीन मरकझमधील एक धक्कादायक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. यामध्ये 'मरण्यासाठी मशिदीपेक्षा चांगली जागा नाही' अशा आशयाचे विधान मौलवी करताना आढळतात. त्यामुळे, अशा पद्धतीने मशिदीत एकत्र जमण्यामुळे आपल्यासोबतच अनेकांच्या जीवाला धोका असल्याची पूर्वकल्पना त्यांना होती, असे या ऑडिओ क्लीपवरून समोर येते.







या ऑडिओ क्लीपमध्ये मौलाना म्हणतात 'मशिदीमध्ये जमा होण्याने आजार होईल, हा विचारही मूर्खपणाचा आहे. तुम्हाला मशिदीत येण्याने व्यक्ती मरेल असे दिसले तरी मी तर म्हणतो की, मरण्यासाठी यापेक्षा चांगली जागा असून शकत नाही. अल्लाहवर विश्वास ठेवा. कुराण वाचत नाहीत, वर्तमानपत्रे वाचतात आणि घाबरून पळत सुटतात. अल्लाह यासाठीच काहीतरी अडचणी निर्माण करतो, कारण त्याला पाहायचे असते की अशा परिस्थितीत माझा बंदा काय करतो? जर कुणी म्हणत असेल की मशिदी बंद करायला हव्यात, टाळे लावायला हव्यात कारण हा आजार वाढत जाईल तर हा विचार तुमच्या मनातून काढून टाका', असा उपदेश मौलवी या ऑडिओ क्लिपमध्ये उपस्थितांना करत आहे. या व्हायरल ऑडिओ क्लीपमध्ये मौलवी बोलत असतानाच मागच्या बाजुने काही लोक खोकतानाही ऐकू येत आहेत. त्यामुळे, इथे कोरोनाची लक्षणे आढळूनही किंवा प्रकृती ठिक नसूनही या लोकांनी आरोग्य यंत्रणेला याबद्दल काहीच माहिती दिली नसल्याची धक्कादायक गोष्ट समोर येतेय.


 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121