‘सीएए’ नागरिकत्व देणारा कायदा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Mar-2020
Total Views |
madhav _1  H x



भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांचे प्रतिपादन

कल्याण : “ ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ (सीएए) हा नागरिकत्व देणार आहे. कोणत्याही समाजातील नागरिकांचे नागरिकत्व यामुळे हिरावले जाणार नाही,” असे प्रतिपादन भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी केले.

कल्याणमधील छत्रपती शिक्षण मंडळातर्फे रामभाऊ म्हाळगी स्मृतिदिनानिमित्त ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ या विषयावर भांडारी यांच्या उपस्थितीत विशेष व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नूतन विद्यालयात आयोजित कार्यक्रमासाठी अनेकांनी गर्दी केली होती. या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना माधव भांडारी यांनी सुरुवातीला रामभाऊ म्हाळगी यांच्या काही आठवणी जागवल्या आणि त्यानंतर ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’संबंधी अत्यंत विस्तृत माहिती सोप्या शब्दात सांगत आक्षेपांना खोडून काढणारी प्रभावी मांडणी केली. ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’त १९५५ पासून झालेल्या सुधारणांची संख्या, त्यासंबंधी घेतले जाणारे - संसदीय मार्ग डावलणे, ‘कलम १४’चा भंग, फक्त तीन देशांतील नागरिकांनाच नागरिकत्व का, यासारख्या आक्षेपांना उत्तर देतानाच त्या आक्षेपांमधील फोलपणादेखील श्रोत्यांसमोर ठेवला. आपल्या संबोधनात शेवटी त्यांनी हा कायदा नागरिकत्व देणारा असून नागरिकत्व काढून घेणारा नसल्याचे सांगितले. या प्रसंगी छत्रपती शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरणदेखील झाले. शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या प. स. मराठे स्मृती पारितोषिक आंतरशालेय निबंध स्पर्धेत अजित शेडगे, माध्यमिक विद्यामंदिर रातवड यांनी ‘शिक्षण व संस्कार, प्रथम काय हवे?’ या विषयावरील निबंधात प्रथम पारितोषिक मिळवले. द्वितीय क्रमांक प्रतिभा उपासनी, जनता विद्या मंदिर प्रशाला दहिवली, तर तृतीय क्रमांक वसुधा भास्कर जोशी नवजीवन विद्यामंदिर कल्याण यांनी मिळवला. उत्तेजनार्थ पुरस्कार मनोहर सुरवाडे, माध्यमिक विद्यालय तलासरी, दीपाली सुधीर मराठे, माध्यमिक विद्यालय विवेकानंद संकुल सानपाडा यांनी मिळवला, तर परीक्षक पारितोषिक प्राध्यापक अरुण कासार, वरिष्ठ महाविद्यालय पडघा यांना मिळाले.

@@AUTHORINFO_V1@@