‘या’ बँकांचे विलीनिकरण होणारच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Mar-2020
Total Views |

bank_1  H x W:


देशातील १० सरकारी बँकांचे एकत्रीकरण करून चार मोठ्या बँकांची निर्मिती



मुंबई : येत्या १ एप्रिलपासून अनेक ग्राहकांच्या बँकांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे देशातील १० सरकारी बँकांचे एकत्रीकरण करून चार मोठ्या बँकांची निर्मिती करण्यात येणार आहे. सध्या ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या चार बँकांची निर्मिती ही आजवरचे सर्वांत मोठे विलीनीकरण ठरण्याची शक्यता आहे. कोविड-१९ चा संसर्ग वाढत असला तरी सरकार आपल्या पूर्वीचा एकत्रीकरणाचा कार्यक्रम राबवण्यावर ठाम आहे.


रिझर्व्ह बँकेने शनिवारी या विषयी सूतोवाच केले. चालू महिन्याच्या सुरुवातीला या संदर्भातील एक अधिसूचना जारी करण्यात आली होती. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाच्या शाखा पंजाब नॅशनल बँकेच्या शाखा म्हणून कार्यरत राहणार आहेत. त्याचवेळी सिंडिकेट बँकेचे कॅनरा बँकेमध्ये विलीनीकरण होणार आहे. आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेच्या शाखा युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलीन होणार आहेत. अलाहाबाद बँकेच्या शाखा इंडियन बँकेच्या शाखा म्हणून ओळखल्या जाणार आहेत.


बँक कर्मचारी संघटनांनी बँकांचे बहुचर्चित एकत्रीकरण हाणून पाडण्यासाठी अनेक प्रयत्न केले खरे, पण त्यांना यश आले नाही. रिझर्व्ह बँकेचे महाप्रबंधक योगेश दयाल यांनी जारी केलेल्या जाहिरातीनुसार, अलाहाबाद बँकेच्या सर्व शाखा १ एप्रिल २०२० पासून इंडियन बँकेमध्ये विलीन करण्यात येणार आहेत. याशिवाय आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेच्या सर्व शाखा १ एप्रिल २०२०पासून युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखा म्हणून कार्यरत राहणार आहेत.


देशात जागतिक दर्जाच्या बँक स्थापन व्हाव्यात यासाठी केंद्र सरकारने १० बँकांचे एकत्रीकरण करून चार बँकांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. बँकांच्या एकत्रीकरणाची योजना डिसेंबर २०१८मध्ये सादर करण्यात आली.
@@AUTHORINFO_V1@@