कोरोनाशी लढा : रा.स्व.संघातर्फे 'अन्नपूर्णा' उपक्रम

    24-Mar-2020
Total Views |
annapurna_1  H
 
 
 

तुम्हीही सहभागी होऊ शकता

मुंबई : कोरोनाशी लढा देत असताना लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशातील उद्योगधंदे बंद आहेत. अशातच हातावरचे पोट असणाऱ्या मुंबईतील कामगार आणि कष्टकऱ्यांची दोन वेळच्या जेवणाची मोठी आबाळ होत आहे. यावर उपाय म्हणून रा.स्व.संघाच्या जनकल्याण समिती मुंबईने 'अन्नपूर्णा' उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमातून मुंबईतील रिक्षा-टॅक्सीचालक, मजूर, कारागीर यांना दोन वेळचे जेवण पोहोचवण्याची जबाबदारी स्वयंसेवकांनी घेतली आहे. यासाठी मुंबईतील काही कुटूंबांनी ही जबाबदारी उचलली आहे.
 
 
आपल्या परिसरातील गरजू आणि भुकेल्या जीवांनाही आपण मदत करू इच्छीत असाल तर https://forms.gle/VZotN1qLmUhixhxu8 या लिंकवर जाऊन फॉर्म भरावा आणि या कामात सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, मुंबईतर्फे करण्यात येत आहे.




 
 
अग्रलेख
जरुर वाचा
रिपब्लिकन पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी मुश्ताक बाबा यांची नियुक्ती - गौतम सोनवणे

रिपब्लिकन पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी मुश्ताक बाबा यांची नियुक्ती - गौतम सोनवणे

पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते मुश्ताक बाबा यांची अधिकृत निवड करण्यात आल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी केली.रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार मुश्ताक बाबा यांची रिपाइं च्या अल्पसंख्यांक आघाडी च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी निवड करण्यात आल्याची माहिती रिपाइं चे राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी दिली. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121