जेजुरी-मोरगाव अपघातावर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक! मृतांच्या कुटुंबाला २ लाखांची मदत जाहीर
19-Jun-2025
Total Views | 42
पुणे : पुणे जिल्ह्यातील जेजुरी-मोरगाव मार्गावर झालेल्या भीषण अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.
बुधवार, १९ जून रोजी सायंकाळी जेजुरी-मोरगाव मार्गावर एक कार रस्त्यावर उभ्या असलेल्या पिकअप टेम्पोला धडकली. यात टेम्पोमधून साहित्य बाहेर काढणारे चार मजूरांसह कारमधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, जेजुरी-मोरगाव मार्गावर रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी २ लाख रुपये सानुग्रह मदत तर जखमींना ५० हजार रुपये मदत जाहीर केली आहे.