पाकिस्तानाचे लढाऊ विमान कोसळले ; वैमानिकाचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Mar-2020
Total Views |


fighterplane pakistan _1&


इस्लामाबाद : पाकिस्तान हवाई दलाचे विमान एफ १६ विमान कोसळल्याची दुर्घटना घटली. या दुर्घटनेत विमानाच्या पायलटचा मृत्यू झाला आहे. विंग कमांडर नौमन अक्रम याचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. इस्लामाबादजवळील शकरपारियामध्ये हा अपघात झाला. पाकिस्तान डे निमित्त होणाऱ्या परेडसाठी हा सराव सुरू असताना अपघात झाला असल्याची माहिती आहे.



अमेरिकन बनावटीचे एफ-१६ हे सर्वोत्तम लढाऊ विमान समजले जाते. अमेरिकेकडून पाकिस्तानला काही वर्षांआधी हे लढाऊ विमान देण्यात आले होते. या विमानाला अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती अधिकृतपणे समोर आली नाही. या घटनेच्या चौकशीसाठी एका समितीची नेमणूक करण्यात आली आहे.

@@AUTHORINFO_V1@@