कोरोनावर मात करणारी ‘मनीषा’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2020
Total Views |

manisha dhatrak_1 &n



डोळ्याला न दिसणार्‍या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले, ते अद्याप संपुष्टात आलेले नाही. ‘आमचे काम, हीच आमची ओळख’ म्हणत भाजपच्या माजी नगरसेविका मनीषा शैलेश धात्रक यांनी कोरोनाकाळात गरजूंना मदत केली. स्वत:ला कोरोनाची लागण होईल ही भीती मनात कधी बाळगली नाही. नि:स्वार्थी भावनेने काम करीत प्रसिद्धीपासून दूर राहत ‘कोविड’ काळात मनीषा धात्रक यांनी केलेल्या कार्याचा आढावा.


मनीषा शैलेश धात्रक
राजकीय पक्ष : भाजप
प्रभाग क्र. : ६०, गणेश मंदिर, ऐलोरा सोसायटी
पद : माजी नगरसेवक
संपर्क क्र. : ९८१९९३६४४४


कोरोना संसर्गाचा धोका लक्षात आल्यावर लगेचच धात्रक यांनी कामाला सुरुवात केली. आपला प्रभाग कोरोनामुक्त ठेवण्यासाठी धात्रक यांनी उत्तम पद्धतीने नियोजन केले. प्रभागातील इमारती, चाळी, गृहसंकुले या विविध ठिकाणी जंतुनाशक फवारणी केली. त्यांनी परिसर निर्जंतुकीकरण करणे आणि सार्वजनिक स्वच्छतेला विशेष प्राधान्य दिले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, याचा विचार करून त्यांनी जनजागृती करण्यास सुरुवात केली. जनजागृती माहिती पत्रकांचे वाटप केले. ‘मीच माझा रक्षक... लढा कोरोनाशी..’ म्हणत कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी विभागात त्यांनी रिक्षाद्वारे, ‘नियमांचे पालन करा, सतर्क राहा,’ असे आवाहन नागरिकांना केले. कोरोना काळात सरकारने नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले होते. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचा धोका अधिक होता. नागरिकांना औषधे किंवा जीवनावश्यक वस्तू पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांची फौज उभारली. भाजप कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांनी कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच दिल्या.


‘कोविड’काळात अनेकांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली, तर अनेकांना ५० टक्क्यांपेक्षा जास्त पगारकपातीचा सामना करावा लागला. त्यामुळे चांगल्या सोसायटीत राहणार्‍या नागरिकांची आर्थिक फरफट सुरू झाली. मध्यमवर्गीय माणूस हा स्वाभिमानी आहे. तो कुणाकडे मदतीसाठी हात पसरणार नाही, हे धात्रक यांनी ओळखले होते. गरजूंनी धात्रक यांच्याकडे पोहोचण्याआधी त्याच गरजूंपर्यंत पोहोचले व त्यांनी गरजूंना मदत केली. कोणतेही फोटो न काढता, कोणतीही प्रसिद्धी न करता, त्यांनी प्रभागातील प्रत्येक सोसायटीत फूड पॅकेटचे वितरण केले. काहींना त्यांनी धान्य वितरण केले. धान्य वितरण सरसकट सगळ्यांनाच त्या करीत आहेत. त्यामुळे ‘ही व्यक्ती माझ्या प्रभागातील नाही,’ हा भेदभाव त्यांनी केला नाही. गणेश मंदिर, एलोरा सोसायटी प्रभाग आणि विष्णुनगर प्रभाग याविषयी इतर प्रभागातील नागरिकांनाही मदत केली. प्रत्येकाच्या मदतीला त्या धावून गेल्या. त्यांचे अन्नधान्यवाटपाचे मदतकार्य अजूनही सुरूच आहे. प्रत्येक घरात किमान तीन वेळा तरी अन्नधान्याचे किट दिले आहेत. सुरुवातीला सात हजार नागरिकांना अन्नधान्याचे किट दिले आहेत. ‘लॉकडाऊन’मुळे डोंबिवली व बाहेरगावी अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या इच्छितस्थळी जाण्यास पोलीस प्रशासन व महापालिका यांच्या मदतीने काम केले. धात्रकांसारख्या प्रसिद्धीचे हाव नसणार्‍या, नि:स्वार्थी भाजप कार्यकर्त्या अपवादानेच मिळतात. धात्रक यांच्याकडे असलेली नम्रता, सदैव हसतमुख आणि दांडगा जनसंपर्क या आधारावर, ‘तुम्ही हाक मारा, आम्ही तुमच्यासाठी, तुमच्या मदतीसाठी व तुमच्या अडचणी सोडविण्यासाठी सदैव तयार आहोत.’ हेच त्या आपल्या प्रभागातील नागरिकांना सांगत असतात. त्यांच्या वर्तनातून आणि वागणुकीतून नेहमी या गोष्टी मदत घेणार्‍या नागरिकांना प्रतित होत असतात.


धात्रक यांनी आपला परिसर निर्जंतुकीकरण करण्यासाठी १२ जणांचे एक पथक तयार केले. या पथकाद्वारे प्रभागात नियमित फवारणी केली जाते. ज्या सोसायटीत कोरोना रुग्ण आढळून येतो, त्याठिकाणी ही प्राधान्याने फवारणी केली जाते. या १२ जणांच्या वेतनाचा खर्चही धात्रक स्वत: करतात. कोरोनाकाळात सुरुवातीला वाहतूक व्यवस्था बंद होती. त्यामुळे धात्रक यांनी कोणाला तपासणीसाठी जायचे असेल किंवा कोणत्याही कारणास्तव रुग्णालयात जावे लागले, तर रिक्षावाहतूक बंद होती. धात्रक यांनी स्वत:च्या गाड्या रुग्णांच्या मदतीसाठी दिल्या. काहींना खासगी रुग्णालयात चाचणी करून घ्यायची होती, अशा सर्वांना त्यासाठी पैसे दिले. नागरिकांनी आपल्यावर विश्वास टाकून आपल्याला निवडून दिले आहे. कोरोनाचे संकट गंभीर आहे. या परिस्थितीत प्रभागातील नागरिकांच्या मदतीला धावून गेले पाहिजे. नागरिकांना जेव्हा गरज आहे, तेव्हा मदत केली नाही तर नगरसेवकपदाचा उपयोगच काय? हा विचार करून धात्रक दररोज घराबाहेर पडत होत्या. या सगळ्यात सर्व प्रकारची काळजी घेऊनही त्यांना कोरोनाची लागण झाली.

manisha dhatrak_1 &n


कोरोनाकाळ हा प्रत्येकासाठी अत्यंत वाईट काळ आहे. ही परिस्थिती कोणावरही येऊ नये, अशीच इच्छा आहे. पण, या परिस्थितीत ज्यांच्याकडे समाजाला देण्याची कुवत आहे त्यांनी ते द्यावे. आपण समाजाला दिले पाहिजे हे त्या व्यक्तीला समजले पाहिजे. आपण समाजाचे देणे लागतो, हे प्रत्येकाने ध्यानात ठेवले पाहिजे. माझा प्रभाग हा माझा अभिमान आहे, तर मतदार हा माझा विश्वास आहे.



मनीषा यांचे पती शैलेश धात्रक यांना प्रथम कोरोनाची लागण झाली. त्यातून ते बरे झाले. त्यानंतर मनीषा धात्रक यांना लागण झाली. विशेष म्हणजे, कोरोनाची लागण झाल्यानंतर मनीषा यांना कळलेच नाही. काही दिवसांनी त्यांना चक्कर येणे, यासारखे त्रास जाणवू लागले. त्यानंतर त्यांना कोरोना होऊन गेल्याचे समजले. कोरोना होऊन गेल्याने त्यांच्या शरीरात अशक्तपणा असल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले. शैलेश यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. या परिस्थितीतही त्यांचे मदतकार्य सुरूच होते.मनीषा यांचे पती शैलेश धात्रक हेदेखील नगरसेवक असल्याने त्यांना त्यांच्या कामात पतीचा पूर्णपणे पाठिंबा होता. शैलेश हे स्वत:देखील तळमळीने प्रभागातील नागरिकांसाठी काम करीत होते. मनीषा या बाहेरून घरी आल्यावर स्वत:ची पूर्ण काळजी घेत होत्या. पण, अखेर कोरोनाने त्यांना हेरले. आपल्या कार्यकर्त्यांची संपूर्णपणे जबाबदारी त्यांनी घेतली होती. त्यामुळे कार्यकर्ते त्यांच्यासाठी झोकून देऊन काम करीत आहेत. मनीषा यांच्या मुलांना आणि कार्यकर्त्यांना कोरोनाची लागण न झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.


धात्रक यांनी कोरोनाकाळात जे काम केले, त्यामुळे नागरिकांचे अश्रू अनावर झाले होते. त्यांच्याकडे बोलण्यासाठी शब्दच नव्हते. काही महिलांना एवढे गहिवरून आले होते, ते पाहून धात्रक यांना त्यांना मिठी मारावी, असे वाटत होते. पण, कोरोनामुळे ते करणे शक्य नव्हते. महापालिकेकडून देण्यात येणारा नगरसेवक निधी कोरोनाकाळात आला नाही. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर खर्च करून त्यांनी नागरिकांची मदत केली. या सगळ्या कामात त्यांना अनेकांचे सहकार्य लाभले. त्यामध्ये डोंबिवली विभागाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहासिनी बेडेकर, शास्त्रीनगर हेल्थ सेंटरच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता हुले, डॉ. तृप्ती बारी, सरोजिनी मोकल, वैशाली जोंधळे, सुवर्णा आंबोरे, दीपक बागुल, कमलाकर पवार, ज्योती धोके आदीचे सहकार्य मिळाले. कोणतेही काम करताना वरिष्ठांचे मार्गदर्शन मोलाचे ठरते. माजी राज्यमंत्री आणि आमदार रवींद्र चव्हाण, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांच्या मदतीशिवाय हे काम पूर्णत्वास नेणे शक्य नव्हते. त्यामध्ये प्रामुख्याने नमिता कीर, प्राची साळेकर, दिव्या परब, मनाली कदम, नम्रता देवकर, दीपक बाविस्कर, केतन संधानी, सूरज गुप्ता, सुधीर पेडणेकर, श्रीनिवास नायडू, रोहित गरुड, विनायक गोखले, किशोर पाटील, संदीप खैरनार, राजू सिंग, सचिन सावंत, आतिश चेवले, शैलेश खेड, स्वप्निल पाटील यांचा सहभाग होता.


- जान्हवी मोर्ये
@@AUTHORINFO_V1@@