थर्टी फस्टला बाहेर पडून कोरोनाला आमंत्रण देऊ नका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Dec-2020
Total Views |
थर्टी फस्टला बाहेर पडून कोरोनाला आमंत्रण देऊ नका
नियम मोडणाऱ्यावर ड्रोनची नजर
पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांची माहिती
 

viveak pansare photo_1&nb 
 
 
 
 
 



कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाची संख्या कमी झालेली असली तरी कोरोनाचा प्रादूर्भाव नष्ट झालेला नाही. त्यामुळे थर्टी फस्टच्या रात्री घराबाहेर पडून कोरोनाला आमंत्रण देऊ नका असे आवाहन कल्याणचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी केले आहे. नियम मोडणाऱ्यावर ड्रोनच्या साहाय्याने नजर ठेवली जाणार आहे अशी माहिती उपायुक्त पानसरे यांनी दिली आहे.
 

31 डिसेंबरच्या रात्री 11 वाजल्यानंतर पाचजण एकत्रित दिसले तर त्यांच्या विरोधात कायेशीर कारवाई केली जाणार आहे. सोसायटय़ांच्या गच्चीवर कोणताही कार्यक्रम करताना आढळून आल्यास त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल. प्रत्येक सोसायटय़ांना तशा स्वरुपाच्या नोटिसा आधीच पोलिस प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहे. या सगळ्य़ावर देखरेख ठेवण्यासठी ड्रोन कॅमेराचा वापर केला जाणार आहे. दुर्गाडी, गांधारी, शहाड, पलावा, टाटा नाका, बदलापूर या ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे. प्रत्येक वाहनांची तपासणी केली जाईल. वाहन चालक व वाहनातून प्रवास करणारे यांनी मद्यपान केले आहे का याची चाचणी केली जाईल. त्यासाठी पोलिसांना ब्रेथ अँँनालायझर देण्यात आलेले आहे. प्रसंगी काही ठिकाणी रक्ताचे सॅम्पलही गोळा केले जातील. पोलिसांची 20 विशेष पथके तैनात करण्यात येणार आहे. नियम भंग होणार नाही याची काळजी सगळ्य़ांनी घेतली पाहिजे असे आवाहन उपायुक्त पानसरे यांनी केले आहे.
 
 

----------------------
 
 
@@AUTHORINFO_V1@@