एका लसीने जोडले गावाखेड्याशी ‘स्नेहसंबंध’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Dec-2020
Total Views |
T T_1  H x W: 0
 


'प्रोजेक्ट स्नेहसंबंध'द्वारे जगातील सर्वात मोठी धनुर्वात लसीकरण मोहीम


मुंबई: देशभरातील १३ राज्यांमध्ये जगातील सर्वात मोठी धनुर्वात लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. गावाखेड्यांमध्ये कारखान्यांतील यंत्रकामगार आणि मजुरांना होणार्‍या जखमांकडे कामाच्या गडबडीत दुर्लक्ष केले जाते, अशा जखमांमुळे व्याधी बळावून ती जखम दीर्घकाळ राहिल्याने धनुर्वाताची व्याधी होण्याची शक्यता जास्त असते. बर्‍याचदा कामगारांच्या आरोग्य चिकित्सेची काळजी कारखान्यांमध्ये घेतली जात नाही.
ही समस्या डोळ्यांसमोर ठेवून देशभरातील गावाखेड्यांमध्ये धनुर्वात लसीकरण मोहीम राबविण्याचा संकल्प प्रोजेक्ट स्नेहसंबंधाद्वारे ठेवण्यात आला. ‘रुरल मार्केटिंग’चे शिल्पकार प्रदीप लोखंडे, ‘फ्लीटगार्ड’ आणि ‘रुरल रिलेशन डॉट कॉम’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रोजेक्ट स्नेहसंबंध’ राबविण्याची संकल्पना मांडण्यात आली. मोहिमेची सुरुवात करताना ‘रुरल रिलेशन डॉट कॉम’च्या ग्रामविकास अधिकार्‍यांनी तळागाळातील यंत्रज्ञ कामगारांची भेट घेतली.
धनुर्वाताच्या लसीकरणाबद्दल जनजागृतीही करण्यात आली. त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना विश्वासात घेऊन लसीकरणासाठी एक ‘धनुर्वात इंजेक्शन कार्ड’ विकसित करण्यात आले. याच वेळी संबंधित मजूर, यंत्रकामगारांच्या परिसरातील डॉक्टरांनाही या कामात सहभागी केले. ‘धनुर्वात इंजेक्शन कार्ड’ जवळच्या दवाखान्यात दाखविल्यानंतर संबंधित यंत्रकामगारांना हे इंजेक्शन आता मोफत मिळणार आहे.
 
 
या प्रकल्पाच्या दुसर्‍या टप्प्यात डॉक्टर स्वतः धनुर्वाताचे इंजेक्शन उपलब्ध करून देतील, तसेच डॉक्टर स्वतः ठरवून दिलेल्या ठिकाणी हे इंजेक्शन देण्यासाठी ठरावीक वेळानंतर जाणार आहेत. या प्रकल्पांतर्गत ५१ हजार २०५ यंत्रकामगारांना ही लस देण्यात आली आहे, अशी माहिती ‘रुरल रिलेशन डॉट कॉम’च्या समन्वयक युगांती लोखंडे यांनी दिली आहे.



@@AUTHORINFO_V1@@