ब्रिटन ठरला कोरोनावरील लसीला परवानगी देणारा पहिला देश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Dec-2020
Total Views |

corona_1  H x W





पुढील आठवड्यापासून कोरोना लसीकरणास प्रारंभ





ब्रिटन: कोरोनावरील फायझर आणि बायोएनटेकच्या लसीला ब्रिटन सरकारने परवानगी दिली आहे. कोरोनावरील जगातील ही पहिली लस ब्रिटनमध्ये पुढच्या आठवड्यापासून उपलब्ध होणार आहे. ब्रिटन हा कोरोनावरील लसीला परवानगी देणारा पहिला देश ठरला आहे.


१० महिन्यांच्या कालावधीत ही लस विकसित करण्यात आली असून फायझर - बायोएनटेकच्या लशीचे ४ कोटी डोसेस युकेने यापूर्वीच ऑर्डर केलेले आहेत. या डोसेसच्या मदतीने २ कोटी लोकांना ही लस देता येईल. यापैकी १ कोटी डोस येत्या काही दिवसांत युकेमध्ये उपलब्ध होणार आहेत.


त्याचप्रमाणे आपत्कालीन वापरासाठी अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीच्या कोरोना प्रतिबंधक लसीला मंजूरी मिळण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. त्याबाबत नुकत्याच समोर आलेल्या अहवालानुसार कोरोना संसर्गावर ही लस ९४.१% परिणामकारक असल्याचे दिसून आले. तर काही प्रौढ रुग्णांमध्ये १००% प्रभावी असल्याचे निर्दशनास आले आहे. सदर लस मॉडर्ना कंपनी आणि अमेरिका सरकारची राष्ट्रीय आरोग्य संस्था एकत्रिपणे विकसित करत आहे.
@@AUTHORINFO_V1@@