सरनाईकांच्या अडचणीत वाढ : सोमय्या देणार टक्कर

    18-Dec-2020
Total Views | 253

Kirit_1  H x W:
 
 
 
ठाणे : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांच्यातील वाद शमता शमेनासा झाला आहे. दोघांनीही एकमेकांविरोधात पोलीसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत. 'व्होल्टास कंपनी कोविड सेंटर' वरील आरोपांना उत्तर देताना सोमैया व भाजप गटनेते संजय वाघुले यांची पोलीस चौकशी करण्याची मागणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गुरुवारी सरनाईक यांनी केली असताना सोमय्या यांनीही शुक्रवारी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात सरनाईक यांच्याविरोधात तकार दाखल केली आहे. 
 
तसेच, १०० कोटींचा दाव्याची खिल्ली उडवताना सोमय्या यांनी, 'चोर मचाये शोर'असे म्हटले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी शिवसेनेचे ठाण्यातील ओवळा-माजिवड्याचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. प्रताप सरनाईक यांची ठाण्यातील विहंग गार्डनमधील दोन १३ मजली इमारती अनधिकृत असुन त्यांनी रहिवाशांची फसवणूक केली आहे. तेव्हा सरनाईक यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असा तक्रार अर्ज किरीट सोमय्या यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल केला.
 
तब्बल १३ वर्ष विहंग गार्डन इमारतीना ओसीच (वापर परवाना) नाही. ही कारवाई सेनेचीच सत्ता असलेल्या ठाणे महापालिकेने केली आहे. तेव्हा कलम ४२० अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सोमैया यांनी केली आहे. दरम्यान, प्रताप सरनाईक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी अब्रु नुकसानीचा दावा ठोकुन दाखवावा, असे प्रतिआव्हान देखील सोमैया यांनी दिले आहे. प्रताप सरनाईक यांचा दावा म्हणजे 'चोर मचाये शोर 'असल्याचेही सोमय्या म्हणाले.
अग्रलेख
जरुर वाचा
क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

भारतात केंद्रीय पातळीवर नवीन विद्यापीठ स्थापन करण्याची प्रक्रिया मुख्यत्वे शिक्षण मंत्रालय आणि त्याखालील उच्च शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. यासंदर्भात विद्यापीठाच्या मान्यता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ‘विद्यापीठ अनुदान मंडळ’ (णॠउ)देखील महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच, जर एखादे विद्यापीठ राज्यस्तरीय किंवा खासगी स्वरूपाचे असले, तर संबंधित राज्याचा उच्च शिक्षण विभाग किंवा राज्य सरकारचा इतर संबंधित विभाग अथवा संस्था त्यांच्यासोबत समन्वयाच्या भूमिकेत आवश्यक मंजुरी व नियमनासाठी कार्य ..

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

प्राचीन भारतीय शिक्षणव्यवस्था कशा प्रकारची होती आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी त्या व्यवस्थेच्या विविध आयामांचे आकलन का महत्त्वाचे आहे, हे आपण पाहिले. अब्राहमिक विचाराधारांशी संघर्ष झाल्यावर या व्यवस्थेला उतरती कळा कशी लागली, याही विषयाचा थोडयात आढावा आपण घेतला. वसाहतवादाचा शिक्षणावरील परिणाम हा एक समग्र ८०० ते एक हजार वर्षांच्या कालखंडाचा इतिहास आहे. परंतु, ब्रिटिश वसाहतवाद हा एक प्रकारचा सैद्धांतिक वर्चस्ववादही असल्याने या कालखंडातील शैक्षणिक अधोगतीला अनेक पैलू जोडले जातात. ब्रिटिशांचे पारतंत्र्य व ..

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

जागतिक पर्यावरण दिनासाठी सगळे जग सज्ज होत असताना मुंबईभर विस्तारलेल्या मेट्रो व मोनोरेलच्या स्थानकांवर ई-स्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लि.ने (एमएमएमओसीएल) जपानच्या होंडा मोटर कंपनी लिमिटेडची उप कंपनी असलेल्या होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा. लि.शी भागीदारी केली आहे. या हरित उपक्रमांतर्गत २५ मेट्रो स्थानके व ६ मोनो रेल स्थानकांच्या ठिकाणी होंडाचे हे ॲडव्हान्स्ड बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान बसविण्यात येईल. यातून एमएमएमओसीएलला तिकीटाव्यतिरिक्त सुमारे ₹३० ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121