नवज्योत सिंग सिध्दू आता कुठे गायब ? भाजपचा सवाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2020
Total Views |


siddhu _1  H x



नवी दिल्ली
: गुरु नानाकासाहेब या शीख श्रद्धास्थानी पाकिस्तानकडून झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारताकडून या घटनेचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला. परंतु या प्रकरणावर काँग्रेसकडून मात्र मौन पाळण्यात येत आहे. यामुळे भारतीय जनता पक्षाने या घटनेबाबत काँग्रेसवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या घटनेवरून भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी कॉंग्रेसवर हल्ला केला आहे. मीनाक्षी लेखी म्हणाल्या की, 'मी आतापर्यंत या प्रकरणात कॉंग्रेसकडून काहीही ऐकले नाही. नवज्योतसिंग सिद्धू कुठे गेले आहे? हे सर्व घडूनही त्यांना आयएसआयच्या प्रमुखांना मिठी मारण्याची इच्छा असेल तर कॉंग्रेसने त्यात लक्ष घातले पाहिजे.



पुढे मीनाक्षी लेखी म्हणाल्या
, 'हे बाबा नानक यांचे मंदिर असल्याने जगभरातील शीखांसाठी पवित्र श्रद्धास्थान आहे. बाबा नानक यांचा जन्म येथे झाला. हे शीख धर्माचे एक पवित्र ठिकाण आहे. लेखी यांनी पाकिस्तान सरकारवर जोरदार निशाणा साधताना म्हटले आहे की, 'नानकाना साहिबचे नाव बदलून गुलाम-ए-मुस्तफा असे ठेवले जाईल अशीही त्यांनी धमकी दिली, तेही २१व्या शतकात.'



मीनाक्षी लेखी म्हणाल्या
, "नानकाना साहिब घटनेने सीएए का आवश्यक आहे हे सिद्ध केले. नानकाना साहिबमधील शुक्रवारी झालेल्या घटनेचा आम्ही निषेध करतो. पाकिस्तानमध्ये जे घडत आहे ते निंदनीय आहे. तेथे जबरदस्तीने धर्मांतर केले जात आहे. हिंदू आणि शीख यांच्यासह इतर अल्पसंख्याक महिलांना जबरदस्तीने पळवून नेण्यात आले आहे.पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांवरील धार्मिक छळाच्या पीडितांना भारतात नागरिकत्व देण्यास विरोध करणाऱ्या कॉंग्रेससह इतर पक्षांच्या आंदोलनकर्त्यांना याचे महत्व कळले पाहिजे. "

@@AUTHORINFO_V1@@