म्हातारी मेल्याचे दु:ख नको !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jan-2020   
Total Views |


FREE KASHMIR_1  



माध्यमांनी डोक्यावर घेऊन कौतुक केलेले असले, तरी न्यायालयीन कामात माध्यमांची मखलाशी चालत नाही. तिथे कायद्याची जाण असलेला व्यावसायिक वकील मदतीला घ्यावा लागत असतो. म्हैसूरच्या मुलीला जामीन मिळवून देणार्‍या वकिलाने आता तिचे वकीलपत्र सोडलेले असून, नवा वकील मिळताना मारामार झालेली आहे. कारण, तेथील बार कौन्सील म्हणजे वकील संघटनेने ठराव करून या मुलीचे वकीलपत्र घेण्यास आपल्या सदस्य वकिलांना प्रतिबंध घातला आहे. मग तिला अक्कल आली आणि आपण काश्मीरची ‘आझादी’ नव्हे, तर इंटरनेटच्या बंदीपासून मुक्ती, अशा हेतूने फलक झळकवला अशी मखलाशी तिने सोशल मीडियात टाकलेल्या व्हिडिओतून केली आहे. याला निव्वळ ‘भामटेगिरी’ म्हणतात. कारण, तितकी वा तशीच मागणी असेल तर त्या दोन शब्दांच्याही पुढे एक क्षुल्लक इंटरनेट असा शब्द टाकता आला असता ना? इतकीच कंजुषी कशाला?



दिल्लीच्या नेहरू विद्यापीठात जो हिंसाचार झाला
, त्याचा निषेध करण्यासाठी मुंबईतही काही ‘विद्यार्थी संघटना’ म्हणवून घेणार्‍या घोळक्यांनी निदर्शने केलेली होती. ही आजकाल ‘फॅशन’ झालेली आहे. कुठलेही निमित्त काढून अशा टोळीची निदर्शने होत असतात. त्यांचा हेतू कुठूनही प्रसिद्धीच्या झोतात राहणे असाच असतो. कारण, हेतू वा उद्देश कसला, याच्याशी त्यांना तीळमात्र कर्तव्य नसते. या नाटकाला इतकी प्रसिद्धी मिळू लागली आहे की, आता तिथेही आपल्या चित्रपटाचे ‘प्रमोशन’ करायला कलावंतही घुसू लागले आहेत. अन्यथा आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडच्या कामासाठी झाडे तोडण्यावरून रंगलेल्या नाटकाला श्रद्धा कपूर कशाला धावली असती? नंतरच्या नागरिकत्व निदर्शनाच्या जमावात ती कुठे झळकली नाही. जेव्हा आली, त्याच्या जवळपास तिचा चित्रपट प्रदर्शित व्हायचा होता आणि काल-परवा दीपिका पदुकोण ‘छपाक’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मुहूर्तकाळ शोधूनच दिल्लीतल्या नेहरू विद्यापीठात धडकली होती. म्हणून त्याला ‘फॅशन’ म्हणायचे. नंतर त्या झाडांचे काय झाले वा कारशेडच्या बाबतीत कसली प्रगती-अधोगती आहे, त्याकडे श्रद्धाने ढुंकून पाहिले नाही आणि आता दीपिकाही नेहरू विद्यापीठाचे प्रकरण विसरून गेली आहे.



मात्र
, या मुख्य कलावंतांना सोडल्यास अशा घोळक्यातले अन्य कलावंत नेहमीचेच असतात. त्यांना ‘डावे’, ‘पुरोगामी’ वगैरे म्हटले जाते. आजकालच्या चित्रपटात एखादे ‘संदर्भहीन चटकदार’ गाणे असते व त्यावरचा शरीर हिंदकळून सोडणारा नाच असतो. त्याला ‘आयटम साँग’ म्हणतात. तशी ही निदर्शने झाली असून, त्यामध्ये मुख्य कलावंतांच्या आसपास नाचणारे शोभेचे नाचे असतात, तशी ही कायमची यशस्वी पुरोगामी गर्दी झाली आहे. मात्र, आपल्यावरही थोडाफ़ार प्रकाशझोत पडावा, अशी त्यांची अपेक्षा असते. त्यातून मग त्यामध्ये काही चमत्कारिक वेडगळ कृती करण्याचीही स्वतंत्र स्पर्धा चालू असते. ‘फ्री काश्मीर’ हा त्यातलाच प्रकार आहे.



दिल्लीतल्या नाटकानंतर मुंबईत असाच प्रकार झाला होता आणि त्यात मुख्य कलावंत बाजूला पडून एका भलत्या मुलीने
गेट वे’च्या ‘आयटम’मध्ये माध्यमांचे लक्ष वेधून घेतले. तिला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली आणि आता तोच नवा ‘आयटम’ होऊ लागलेला आहे. म्हणूनच त्याला ‘आयटम’ म्हणावे लागते. ‘नागरिकत्व कायदा’ वा नेहरू विद्यापीठाच्या हिंसाचाराचा आणि काश्मीरचा काय संबंध आहे? पण ‘गेट वे’जवळ तसा फ़लक घेऊन एक मुलगी उभी राहिली व पोलिसांना तिच्या त्या आक्षेपार्ह घोषणा फलकासाठी गुन्हा दाखल करावा लागला. कारण, नाच-गाणी करणार्‍यांना त्यात ‘आयटम’ दिसत असला, तरी जागतिक घटनाक्रमामध्ये त्या शब्दांना व तशा सादरीकरणाला वेगळा राजकीय अर्थ असतो. त्याकडे बोट दाखवून पाकिस्तानची माध्यमे किंवा जगभरचे भारतद्वेषी पत्रकार त्याला भारतात होत असलेल्या काश्मिरी जनतेच्या गळचेपीचे नाव देऊन गलका सुरू करतात. म्हणूनच अशा शब्दांना वा प्रचाराला गुन्हा मानले जात असते.



तितकेही ठाऊक नसलेल्यांना आपल्या देशात तरुणाई वा विद्यार्थी असे संबोधणारेही दिवाळखोर आहेत
. त्यामुळेच ‘गेट वे’च्या नाच-गाण्यात फलक घेऊन नाचणार्‍या त्या तरुणीची गोची झाली. त्यामागे कोणते कारण आहे, ते तिला सांगता येईना आणि मग तिने पळवाटा शोधायला सुरुवात केली. काश्मीरमध्ये ‘370 कलम’ रद्द केल्यापासून अनेक निर्बंध लागू करण्यात आले, ते हळूहळू उठवले जात आहेत. त्यापैकी ‘इंटरनेटवर निर्बंध’ असाही एक विषय होता. इंटरनेट सुरू करावे आणि तेथील स्वातंत्र्यावरचे निर्बंध उठवावेत, म्हणून तसला फलक झळकवला, अशी लंगडी भूमिका मुंबईच्या मुलीने अंगाशी आल्यावर घेतली. थोडक्यात, आपण झळकवला तो फलक वा त्यातून निघणारा आशय, देशद्रोह वा गुन्हा असल्याची जाणीव तिला झालेली असावी. अन्यथा ठामपणे तिने आपला पवित्रा पुढे रेटायला हवा होता. पण शेपूट घातले म्हणजे देखावा उभा करण्यासाठीच असले नाटक केल्याची निर्लज्ज कबुली तिने दिली.



आता मुद्दा असा की
, एकदा असे घडल्यावर आणि त्यातली चूक अप्रत्यक्षपणे मुंबईच्या मुलीने मान्य केल्यावर किमान तितके ज्ञान तरी म्हैसूरच्या पुरोगामी विद्यार्थ्यांना असायला हरकत नसावी ना? म्हणजे ज्यांना दिल्लीतल्या हिंसाचार व मुंबईतल्या निदर्शनापासून प्रेरणा मिळते, त्यांना तेथील किमान घटनाक्रम व परिणाम तरी माहिती असायला नको काय? नसेल तर त्यांना सामान्य ज्ञानही नाही म्हणावे लागते आणि म्हणूनच निर्बुद्धही म्हणणे भाग आहे. हे सामान्य ज्ञान असते, तर म्हैसूरच्या निदर्शन नाट्यामध्ये आणखी एका मुलीने ‘फ़्री काश्मीर’चा ठळक फलक झळकावला नसता. तेच झाले आणि तिथेही त्या मुलीविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदलेला आहे. जामिनावर तिची मुक्तता झाली आणि आता पुढल्या संकटात ती सापडली आहे.



जामिनापुरता एक वकील तिच्या मदतीला उभा राहिला
. पण आता पुढला मामला हाताळण्यास त्या वकिलाने नकार दिलेला आहे. कारण, त्या घटनेला माध्यमांनी डोक्यावर घेऊन कौतुक केलेले असले, तरी न्यायालयीन कामात माध्यमांची मखलाशी चालत नाही. तिथे कायद्याची जाण असलेला व्यावसायिक वकील मदतीला घ्यावा लागत असतो. या म्हैसूरच्या मुलीला जामीन मिळवून देणार्‍या वकिलाने आता तिचे वकीलपत्र सोडलेले असून, नवा वकील मिळताना मारामार झालेली आहे. कारण, तेथील बार कौन्सील म्हणजे वकील संघटनेने ठराव करून या मुलीचे वकीलपत्र घेण्यास आपल्या सदस्य वकिलांना प्रतिबंध घातला आहे. मग तिला अक्कल आली आणि आपण काश्मीरची ‘आझादी’ नव्हे, तर इंटरनेटच्या बंदीपासून मुक्ती, अशा हेतूने फलक झळकवला अशी मखलाशी तिने सोशल मीडियात टाकलेल्या व्हिडिओतून केली आहे. याला निव्वळ ‘भामटेगिरी’ म्हणतात. कारण, तितकी वा तशीच मागणी असेल तर त्या दोन शब्दांच्याही पुढे एक क्षुल्लक इंटरनेट असा शब्द टाकता आला असता ना? इतकीच कंजुषी कशाला?



अर्थात
, ही ‘भामटेगिरी’ आहे आणि त्यातही नवे काहीच नाही. अशा भंपकबाजीचा मेरूमणी कन्हैयाकुमार यानेही काही वर्षांपूर्वी अशीच मखलाशी केलेली होती. अफजल गुरूच्या पुण्यतिथीनिमित्ताने जमवलेल्या गर्दीकडून घोषणा वदवून घेताना त्यानेही अशीच ‘भारत से आझादी’ नव्हे तर ‘भारताची आझादी’ असल्या कोलांट्या उड्या मारलेल्या होत्याच. आता त्या म्हैसूरच्या मुलीचे अनेक आश्रयदाते निघतील. म्हैसूर बाहेरून तिची बाजू मांडायला डाव्या वकिलांची फौज तिथे धाडली जाईल. किंबहुना त्याच्याही पुढे जाऊन म्हैसूरच्या वकील संघटनेला संघवादी वा हिंदुत्ववादी म्हणून हेटाळणी सुरू होईल. पण म्हणून बिथरून जाण्याचे कारण नाही. हीदेखील एक ‘फॅशन’च झालेली आहे. काहीही गुन्हा करायचा आणि त्यासाठी कायद्याच्या कचाट्यात आले; मग आपण पुरोगामी असल्याने सूडबुद्धीने कारवाई झाल्याचाही डंका पिटण्याचा भारतीयांना आता सराव झाला आहे. तरुण तेजपाल याने एका मुलीचा विनयभंग करीत बलात्काराचा प्रयास केला होता. त्याने आरोपाचा इन्कारही केला नव्हता.



पण पोलीस यंत्रणेने कारवाईचा बडगा उगारल्यावर मात्र पोलिसांनाच प्रतिगामी ठरवण्यात धन्यता मानलेली होती
. थोडक्यात पुरोगामी राजकारणाचा अजेंडा ठरलेला आहे. त्यात कुठलाही गुन्हा पुरोगाम्याने केलेला असेल तर त्याला निर्दोषमानायचे असते. साहजिकच याही मुलीला निर्दोष ठरवण्यासाठी पोलिसांसहीत वकील संघटनेवरही आरोप होऊ शकतो. पण त्यामुळे गडबडून जाण्याचे कारण नाही. अशा कोणाला तरी कठोर शिक्षा एकदा व्हायला हवी आहे. कदाचित गुन्हा किरकोळ आहे म्हणून माफ़ी मिळता नये. कारण, ही घातक फॅशन बोकाळत चालली आहे आणि त्याच्या आडोशानेच भयंकर गुन्हेगारी सोकावत असते. म्हणतात ना? म्हातारी मेल्याचे दु:ख नसते. काळ सोकावता कामा नये. तसेच इथेही एका मुलीच्या उतावळ्या कृतीला कठोर शिक्षा व्हायलाच हवी. तरच कायद्याचा धाक निर्माण होतो आणि ‘फॅशन’ वा विरंगुळा म्हणून जनजीवन अस्ताव्यस्त करण्याच्या प्रवृत्तीला पायबंद घातला जाऊ शकतो. निदान त्यांना सोकावण्यापासून रोखले जाऊ शकते.

@@AUTHORINFO_V1@@