‘निर्भया’च्या गुन्हेगारांची फाशी पुन्हा लांबणीवर?

    15-Jan-2020
Total Views | 45

nirbhaya_1  H x


नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींची फाशीची शिक्षा आणखी काही दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. दया याचिका फेटाळल्यानंतरही गुन्हेगारांना १४ दिवसांचा अवधी दिला जातो, से सरकारी वकिलांनी हायकोर्टात सुनावणीवेळी सांगितले. दोषी मुकेशने क्युरेटिव्ह याचिका फेटाळल्यानंतर राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली आहे. राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळून लावली तरी, त्यांना १४ दिवसांचा अवधी दिला जातो, से कारण सरकारी वकिलांनी दिले आहे.


डेथ वॉरंटविरोधात दोषी मुकेशने दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टात पुन्हा सुनावणी सुरू झाली आहे. दिल्ली सरकारच्या वतीने वकील राहुल मेहरा यांनी बाजू मांडली. यावेळी हायकोर्टाने दिल्ली सरकार आणि पोलिसांना फटकारले. तुरुंग अधिकाऱ्यांकडून दोषींना पहिली नोटीस बजावण्यास इतका विलंब का झाला, असा प्रश्नही कोर्टाने विचारला. या व्यवस्थेचा दोषींकडून कशा प्रकारे दुरुपयोग केला जात आहे हे यातून स्पष्ट होत आहे. यामुळे लोकांचा व्यवस्थेवरील विश्वास कमी होईल, अशा शब्दांत कोर्टाने सरकारला आणि पोलिसांना फटकारले.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121