'एससीओ’च्या आठ आश्चर्यांमध्ये भारताच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चा समावेश!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2020
Total Views |

unity_1  H x W:

 


१८३ मीटर ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ जगातला सगळ्यात मोठा पुतळा


मुंबई : यूरेशियाच्या आठ देशांच्या
'शंघाई समर्थन संघटना' (एससीओ) या आंतरराष्ट्रीय संघटनेने ‘स्टेच्यू ऑफ युनिटी’ ला एससीओच्या आठ आश्चर्यांमध्ये सामील केले आहेत. भारत, पाकिस्तान, चीन, कजाकिस्तान, किर्गीस्तान, तजाकिस्तान, रशिया आणि उज्बेकिस्तान हे देश एससीओचे सदस्य आहेत.


एससीओचे महासचिव व्लादिमीर नोरोव यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेऊन सदस्य राज्यांच्या सहयोगी भूमिकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. या दरम्यान, भारताने एससीओ प्रमुखांच्या परिषदेत अध्यक्षांची भूमिका बजावण्याची जबाबदारी घेतली आहे. ही गोष्ट सर्व भारतीयांसाठी गौरवास्पद असून, प्रेरणादायी असल्याचे सांगत, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नोरोव यांच्या भेटीनंतर ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली.




भारताचे लोहपुरूष’ सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनी ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या १८३ मीटर पुतळ्याचे उद्घाटन केले. गुजरातमधील हा पुतळा म्हणजेच ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा जगातील सर्वात उंच स्टॅच्यू आहे आणि आता हे जगातील सर्वात महत्वाचे पर्यटन स्थळही बनले आहे.

@@AUTHORINFO_V1@@