'लडाख'मध्ये पर्यटन कार्यालय उभारण्याची केंद्राची घोषणा

    29-Aug-2019
Total Views | 43



मोदी सरकारने कलम ३७० रद्द केल्यानंतर लडाख केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर आज जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने केंद्र सरकारचे अधिकृत असे पर्यटन कार्यालय उभारण्याचा निर्णय आज जाहीर करण्यात आला. यामुळे लडाखमधील स्थानिक लोकांसाठी रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होण्यास हातभार लागेल. लडाखमधील हे पर्यटन कार्यालय विशेषतः लडाखमधील पर्यटनाच्या वृद्धीसाठी काम करेल अशी माहिती सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल यांनी दिली आहे.

लडाखमधील बहुतांश लोकसंख्या उत्पन्नाकरिता ही पर्यटनाशी संबंधित व्यवसायांवर अवलंबून असल्याने तेथे महसूल आणि रोजगार या दोन्ही गोष्टी सुरळीत होण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे. लडाख हा आत्तापर्यंत कायमच वादाच्या भावाऱ्यात अडकलेला प्रदेश असल्याने तेथील विकास आत्तापर्यंत खुंटला होता मात्र या निर्णयाचा लडाखमधील जनजीवनावर आता काय परिणाम होतो हे पाहणे आता महत्वाचे असेल.

लादाखविषयी पुढे बोलताना प्रल्हाद पटेल यांनी लडाखमधील काम पूर्ण झाल्यानंतर आपले लक्ष 'लेह'कडे वळवणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121