विधिवत पूजा गणेशाची, साथ गणेशपूजा अॅपची !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Aug-2019
Total Views |

भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात घरगुती आणि सार्वजनिक स्वरूपात गणेशोत्सव साजरा केला जातो. या काळात वातावरण गणपती बाप्पा मोरयाच्या गजराने भक्तिमय, चैतन्यमय झालेले असते. आरास, सजावट, प्रसाद, मूर्तींचे आकार या सगळ्यांमध्ये सर्वात महत्त्वाचा आणि श्रद्धेचा विषय म्हणजे पार्थिव गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि उत्तरपूजा. प्राणप्रतिष्ठेच्या पूजेच्या विधीतून, मंत्रांतून पार्थिव मूर्तीमध्ये प्राण म्हणजे चैतन्य निर्माण केले जाते. या पूजेमुळे मूर्तीत शंभर टक्के चैतन्य निर्माण होतं. त्याचप्रमाणे उत्तरपूजेद्वारे मूर्तीतील चैतन्य काढून घेतले जाते. ही पूजा शास्त्रोक्त पद्धतीने तज्ज्ञ पुरोहितांच्या किंवा गुरुजींच्या मार्गदर्शनाने व्हावी ही प्रत्येकाचीच इच्छा असते. परंतु, सध्या घरोघरी बसणाऱ्या गणपतींची आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्या प्रमाणात प्रशिक्षित गुरुजींची संख्या कमी आहे. त्यामुळे एकाच व्यक्तीला अनेक घरी पूजा सांगावी लागते. कधीकधी तर पूजा संध्याकाळपर्यंत होत नाही.

 
 

हीच समस्या लक्षात घेऊन पितांबरीने गणेशपूजा App विकसित केले आहे. यातील वैशिष्ट्ये म्हणजे पूर्वतयारीची म्हणजेच लागणाऱ्या साहित्याची, सामग्रीची सविस्तर माहितीसह यादी दिलेली आहे. ही सर्व तयारी पूर्ण झाली की नाही हे तपासण्यासाठी यादीतील साहित्यासमोर बरोबरची खूण करण्याची सुविधादेखील आहे. त्यानंतर प्राणप्रतिष्ठेचा व उत्तरपूजेचा संपूर्ण पूजाविधी आवश्यक त्या सर्व सूचनांसह सुस्पष्ट आणि शुद्ध उच्चारात ध्वनिमुद्रित केलेला आहे. सांगितलेली कृती पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळही दिलेला आहे. पूजाविधींसोबतच गणपती स्तोत्र, अथर्वशीर्ष, गणपतीच्या व अन्य देवांच्या आरत्या, मंत्रपुष्पांजलीदेखील बघून सर्वांना म्हणता येईल.

 

पार्थिव गणपतीची पूजा सर्वत्र शास्त्रोक्त पद्धतीने गुरुजींच्या उपस्थितीतच होणं अपेक्षित आहे. परंतु केवळ गुरुजी उपलब्ध नाहीत या कारणास्तव घरी गणपती बसवण्याची कुणाची इच्छा अपूर्ण राहू नये. याच उद्देशाने हे App विकसित केले आहे. गुरुजींचे महत्त्व कमी करण्याचा कोणताही उद्देश यात नाही. Android मोबाईल फोन्सवर हे App सहजपणे डाऊनलोड करता येऊ शकते. विशेष म्हणजे हे App मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसतानादेखील वापरता येऊ शकते. अशा या गणेशपूजा App मुळे अधिकाधिक भक्तांच्या घरची पार्थिव गणेशपूजा विधिवत आणि यथासांग संपन्न होवो हीच सदिच्छा!...!

 
@@AUTHORINFO_V1@@