काश्मीरात ग्रामपंचायतींवर स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज फडकणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Aug-2019
Total Views |

 

 
नवी दिल्ली: केंद्र सरकारने कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीर मधील वेगळा झेंडा व वेगळी घटना यांसारख्या अनेक गोष्टी आता मान्य होणार नाही. येत्या स्वातंत्र्यदिनी जम्मू आणि काश्मीरमधील सर्व ग्रामपंचायतींवर राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांनी सांगितले. यासाठी केंद्र सरकारने राज्यातील सगळ्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांना सूचना पाठवल्या आहेत व १५ ऑगस्ट रोजी आपापल्या पंचायतींवर राष्ट्रध्वज फडकवला जाईल याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे, असेही त्या आदेशात स्पष्ट करण्यात आल्याचे रेड्डी यांनी पत्रकारांना सांगितले. काश्मीरमधील जनतेनेही आपापल्या घरांवर स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज उभारला पाहिजे, असेही आवाहन रेड्डी यांनी केले आहे.
 
 

रेड्डी म्हणाले की, तेथील परिस्थिती हळूहळू सामान्य होत आहे. लोक घरांतून बाहेर पडत आहेत आणि कुठूनही कोणत्याही प्रकारच्या गडबड, गोंधळाचे वृत्त नाही. पाकिस्तानने आम्ही काहीही व कोणत्याही थराला जाऊन करायला तयार आहोत, असे उघडपणे त्यांच्या नॅशनल असेम्ब्लीमध्ये म्हटलेले असल्यामुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर लष्कर तैनात करण्यात आले आहे. श्रीनगर विमानतळावरून काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद आणि माकपचे नेते सीताराम येचुरी यांना परत पाठवल्याबद्दल बोलताना रेड्डी यांनी सुरक्षा व्यवस्था नजरेसमोर ठेवून त्यांना परत पाठवले गेले. असेच पाऊल राज्याच्या पोलिसांनीही उचलले आहे, असे सांगितले.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@