मुंबई : सर्वसामान्य गृहीणींसाठी जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या सोन्याचा भाव गुरुवारी गेल्या पाच वर्षांतील उच्चांकावर गेला. आंतरराष्ट्रीय बाजारातील ही सर्वाधिक भाववाढ ठरली. अमेरिकेची मध्यवर्ती बॅंक असलेल्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपातीचे संकेत दिले असल्याने त्याचा थेट परिणाम सोन्यातील गुंतवणूकीवर दिसून आला.
अमेरिकेच्या मध्यवर्ती बॅंकेनुसार, जुलैपासून नवे व्याजदर लागू केले जाणार असून जागतिक आणि स्थानिक आव्हानांचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला आहे. व्याजदर कपातीचा परिणाम डॉलरमध्ये होणाऱ्या गुंतवणूकीवर होतो. गुंतवणूकदारांकडून पर्याय म्हणून सोन्यात गुंतवणूक केली जाते. नोव्हेंबर २०१६ नंतर जवळपास दोन टक्क्यांनी घसरण झाली आहे.
अमेरिका आणि चीनमध्ये झालेल्या व्यापारयुद्धामुळे सोन्याच्या भावात ८ टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याचा भाव १ हजार ३८० प्रतिडॉलर औस आहे. २०१४ मध्ये मार्चच्या पहिल्या आठवड्यात हा भाव १ हजार ३८३.८ डॉलरचा टप्पा गाठून आला होता. एमसीएक्स ७२० रुपयांनी वाढून प्रतिदहा ग्रॅम ३३ हजार ७९९ रुपयांवर पोहोचला. तर, चांदी प्रतिकिलो ३७ हजार ८८१ रुपयांवर पोहोचली होती.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat