'देशांतर्गत आव्हानांचा सामना करण्यास तपास यंत्रणा सक्षम' : पंतप्रधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2019
Total Views |

'Investigation system capable of dealing with domestic challenges': Pt. Modi
पुणे _1  H x W:


पुणे : शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात 'आयसर' येथे आयोजित पोलीस महासंचालकांच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील त्यांच्यासमवेत उपस्थित होते. तत्पूर्वी, शुक्रवारी रात्री ते पुण्यातील लोहगाव विमानतळावर पोहोचले. येथे त्यांचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची प्रथमच पंतप्रधान मोदी यांच्याशी भेट झाली.


ही परिषद ८ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत राज्य पोलिस दले
, केंद्रीय अन्वेषण यंत्रणा, गुप्तचर संस्था आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांचे उच्च अधिकारी उपस्थित राहतील आणि अंतर्गत सुरक्षेशी संबंधित विषयांवर चर्चा करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील यात सामील होण्यासाठी एक दिवस अगोदर पुण्यात पोहोचले होते. राज्य सरकारी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार,"पंतप्रधानाचे स्वागत करण्यासाठी उद्धव ठाकरे मुंबईला रवाना झाले. पंतप्रधान मोदी विमानतळावर दाखल झाले तेव्हा माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.






पुण्याच्या पाषाण येथे
'भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थे'च्या प्रांगणात ही परिषद आयोजित केली जात आहे. गृह मंत्रालय दरवर्षी ही परिषद घेते. यापूर्वी हा कार्यक्रम दिल्ली येथे होत असत. परंतु नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून दरवर्षी विविध शहरांमध्ये ही परिषद घेतली जाते. गेल्या वर्षी गुजरातमधील केवडिया येथे ही परिषद झाली होती.

 

@@AUTHORINFO_V1@@