उन्नाव बलात्कार पीडितेची प्रकृती गंभीर

    06-Dec-2019
Total Views | 67


dasf_1  H x W:


नवी दिल्ली : एकीकडे हैदराबाद बलात्कार आणि एनकाऊंटर प्रकरणी देशभरात उषाचे वातावरण असताना दुसरीकडे उन्नावमध्ये झालेल्या पीडितेवरील हल्ल्यासंदर्भात एक दुःखद बातमी आहे. उत्तर प्रदेशच्या उन्नाव बलात्कार पीडितेची जिवंत वाचण्याची शक्यता फारच कमी असल्याचे डॉक्टरांनी शुक्रवारी सांगितले.

 
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, "तिला जीवनरक्ष प्रणालीवर ठेवण्यात आले असून तिची प्रकृती अतिशय नाजूक आहे. डॉक्टरांकडून तिला वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. तरीही ती जिवंत राहील याची शक्यता फार कमी आहे."
 

बलात्कार प्रकरणात जामिनावर सुटलेल्या आरोपींनी पीडितेला गुरुवारी सुनावणीसाठी जात असताना जिवंत जाळले. यात ती ९० टक्के भाजली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरुवातीला तिला उपचारासाठी लखनऊच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यात आले.

अग्रलेख
जरुर वाचा
सैफुल्लाहनंतर पाकिस्तानात आणखी एका दहशतवाद्यावर अज्ञातांकडून हल्ला!

सैफुल्लाहनंतर पाकिस्तानात आणखी एका दहशतवाद्यावर अज्ञातांकडून हल्ला!

(Lashkar-e-Taiba co-founder Amir Hamza) दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा सह-संस्थापक दहशतवादी आमिर हमजावर लाहोरमध्ये अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे. या हल्ल्यात हमजा गंभीर जखमी झाला आहे. यानंतर त्याला उपचारांसाठी पाकिस्तानच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन सिंदूर' राबवून १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. अशातच आता अज्ञातांच्या हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी आमिर हमजा जखमी झाल्याची बातमी समोर ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121