CAA-NRC आंदोलन करणाऱ्या परदेशींना देश सोडण्याचे आदेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Dec-2019
Total Views |

Jane Mate Johnson_1  

 

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाबद्दल गैरसमज पसरवून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशाप्रकारे माथी भडकवण्याचे काम करणाऱ्यांविरोधात कडक पावले भाजपप्रणित राज्यात घेतली जात आहेत. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधातील आंदोलनात सहभागी झालेल्या दोन परदेशी पर्यटकांनाही देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एक जर्मन विद्यार्थी तसेच नॉर्वे येथील एका महिलेलाही व्हिसा नियम उल्लंघन केल्या प्रकरणी देश सोडून जाण्यास सांगण्यात आले आहे.

 

जेन मेट जॉनसन, असे या नॉर्वे येथील महिलेचे नाव आहे. ती पर्यटन व्हिसा घेऊन भारतात वास्तव्याला आली होती. केरळमध्ये २३ डिसेंबर रोजी नागरिकत्व कायद्याविरोधात निघालेल्या मोर्चात त्या सहभागी झाली होत्या. या प्रकरणी ब्युरो ऑफ इमिग्रेशनने तपास केला. या प्रकरणी तिची अधिक चौकशी सुरू करण्यात आली आहे. व्हिसाचे नियम उल्लंघन झाल्याप्रकरणी त्यांना देश सोडून जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


 

यापूर्वी जर्मन विद्यार्थी जॅकोब लिंडेनथाल याच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. आयआयटी मद्रास येथे भौतिकिशास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या जॅकोबवर आंदोलनात सहभागी झाल्याप्रकरणी ही कारवाई झाली आहे. देशातील अंतर्गत बाबींत दखल दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती संबंधितांनी दिली आहे.




@@AUTHORINFO_V1@@