धार्मिक स्वातंत्र्य न देणार्‍या देशांच्या काळ्या यादीत पाकिस्तान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Dec-2019
Total Views |


pak_1  H x W: 0



इस्लामाबाद : अमेरिकेने धार्मिक स्वातंत्र्य न देणार्‍या काळ्या यादीमध्ये पाकिस्तानचा पुन्हा एकदा समावेश केला आहे. ज्या देशांत नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य दिले जात नाही, धर्माच्या आधारावर भेदभाव केला जातो, अशा देशांचा या यादीत समावेश केला जातो. परंतु, या यादीत आपले नाव आल्यानंतर पाकिस्तानने थयथयाट चालू केला आहे. अमेरिकेने भारताऐवजी आम्हाला काळ्या यादीत टाकल्याची टीका पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे.

पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने ही यादी आणि आमच्यावर केले जाणारे आरोप मान्य नसल्याचे म्हटले आहे. अमेरिकेने उचललेले पाऊल वास्तवाला धरून नसल्याची टीका करत, “भारतात अल्पसंख्याकांना त्रास दिला जातो. तरी या यादीत भारताचा समावेश करण्यात आलेला नाही,” अशा शब्दांत पाकिस्तानने आपली नाराजी व्यक्त केली आहे. “अल्पसंख्यांकांना लक्ष्य करण्यासाठी भारतामध्ये एनआरसी आणि सीएएसारखे कायदे करण्यात येत आहेत. असे असतानाही भारताचा या काळ्या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. यावरूनच काळी यादी तयार करण्याच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये भेदभाव करण्यात आला असून यादी तयार करताना एकतर्फी विचार करण्यात आला आहे,” असे पाकिस्तानने जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे. “गो-संरक्षणासाठी भारतात मुस्लिमांना झुंडबळीच्या माध्यमातून लक्ष्य केले जात आहे. काश्मीरमध्ये मागील अनेक महिन्यांपासून अनेक लोक कैद आहेत, असे असूनही अमेरिकेने भारताचा या काळ्या यादीमध्ये समावेश केलेला नाही,” असे पाकिस्तानने म्हटले आहे.


कोणत्या देशांचा यादीत समावेश
?

धार्मिक स्वातंत्र्य न देणार्‍या देशांच्या यादीमध्ये अमेरिकेने बर्मा, चीन, इरिट्रिया, इराण, उत्तर कोरिया, पाकिस्तान, सौदी अरेबिया, तझाकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशांचा समावेश केला आहे. आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य कायदा 1998 अंतर्गत या देशांचा काळ्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंत केवळ 2009 साली या यादीमध्ये भारताचा समावेश करण्यात आला होता.

@@AUTHORINFO_V1@@