आता गोकुळधाम सोसायटीची मस्ती मराठीतही!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2019
Total Views |

tarak_1  H x W:


छोट्यापडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ आता मराठीतून प्रदर्शित होणार आहे. घराघरात पाहिली जाणारी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेल्या दशकभरापासून लोकांचे मनोरंजन करत आहे. केवळ हिंदी भाषिक नव्हे तर इतर भाषिकही ही मालिका आवडीने पाहतात. मुंबईतल्या गोरेवात परिसरात घडणारी ही काल्पनिक कथा प्रत्येक वयोगटाच्या प्रेक्षकांचे मनोरंजन करते. मराठी प्रेक्षकांची मालिकेला मिळणारी पसंती लक्षात घेता आता ही मालिका मराठी भाषेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.




'गोकुळधामची दुनियादारी' या नावाने 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका ‘फक्त मराठी’ या वाहिनीवर दाखवण्यात येणार आहे. गोकुळधाम सोसायटीतील जेठालाल, दयाबेन, तारक, भिडे मास्तर, डॉ हाथी, रोशनसिंग सोढी, पत्रकार पोपटलाल, टप्पूसेना ही पात्र आता प्रेक्षकांचे मराठीतून मनोरंजन करणार आहेत.

@@AUTHORINFO_V1@@