विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून किसन कथोरे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Nov-2019
Total Views |




मुंबई : महाविकासआघाडीचे सरकार नियमबाह्य काम करत असल्याची टीका आज भाजपचे चंद्रकांत दादा पाटील यांनी केली. महाराष्ट्रात सरकार स्थापन होण्यापूर्वी भाजपचे कालिदास कोळंबकर यांना विधानसभेचे हंगामी अध्यक्षपद देण्यात आले होते. परंतु काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील यांना विधानसभेचे हंगामी विधानसभा अध्यक्षपद दिले. हे घटनाबाह्य असून हे नवीन सरकार वारंवार नियमबाह्य काम करत असल्याचे चंद्रकांत दादा पाटील म्हणाले. महाविकास आघाडीची बहुमत चाचणी आज विधानसभेत होत आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाकडून मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.



महाविकास आघाडीतून विधानपरिषद अध्यक्षपद हे काँग्रेसला मिळणार असल्याने काँग्रेसकडून नाना पटोले यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगणार आहे.
'काँग्रेसकडून नाना पटोले हे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरतील. ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना विधीमंडळ कामकाजाचा अनुभव आहे,' अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आज स्पष्ट केले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

@@AUTHORINFO_V1@@