सियाचीनमध्ये पुन्हा हिमस्खलन ; दोन जवान शहीद

    30-Nov-2019
Total Views | 33



नवी दिल्ली : सियाचीन ग्लेशिअरमध्ये सुमारे १८,००० फूट उंचीवर तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या गस्ती पथकावर शनिवारी पहाटे हिम कडा कोसळला. या दुर्घटनेत दोन जवान शहीद झाले. यामध्ये दबललेल्या गस्ती पथकातील जवानांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाने हेलिकॉप्टरच्या मदतीने काम सुरु केले आणि काही जवानांना बाहेर काढले. मात्र, यांतील दोन जवान शहीद झाले आहेत.

 

यापूर्वीदेखील १८ नोव्हेंबर रोजी देखील सियाचीन ग्लेशिअरमध्ये अशाच प्रकारे एक गस्ती पथक हिमस्खलनाखाली सापडले होते. यामध्ये ४ जवान शहीद झाले होते तर दोन पोर्टर्सचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत गस्ती पथकातील ८ जवान आणि पोर्टर बेपत्ता झाले होते. सियाचीन ग्लेशिअर ही जगातील सर्वांत उंचावरील युद्धभूमी आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
पंतप्रधान मोदींकडून अहमदाबादमधील दुर्घटनास्थळाची पाहणी, रुग्णालयातील जखमींची घेणार भेट

पंतप्रधान मोदींकडून अहमदाबादमधील दुर्घटनास्थळाची पाहणी, रुग्णालयातील जखमींची घेणार भेट

(Ahmedabad Plane Crash updates) अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनसाठी उड्डाण केलेलं एअर इंडियाचे विमान गुरुवारी दि. १२ जून दुपारी नागरी वस्तीत कोसळले. या भीषण विमान अपघातात एकूण २६५ लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये वसतीगृहातील राहणाऱ्या डॉक्टर आणि विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये दाखल झाले असून त्यांनी सर्वप्रथम दुर्घटनास्थळी जाऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू, गुजरातचे ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121