भाजपचे कालिदास कोळंबकर हंगामी अध्यक्ष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2019
Total Views |

 


मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी वेगाने घडत आहेत. भाजपने अजित पवारांच्या साथीने सत्ता स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी, मग अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा. आता भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची विधानसभा हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. राज्यपाल भागातसिंग कोश्यारी यांनी त्यांची नेमणूक केली.

 

कशी केली जाते विधानसभा अध्यक्ष्यांची निवड ?

 

नवी विधानसभा स्थापन झाल्यानंतर त्या सदनात सर्वाधिक काळ असणाऱ्या किंवा निवडून आलेल्या सर्वांत ज्येष्ठ सदस्याला हंगामी अध्यक्ष म्हणून निवडलं जातं. विधिमंडळ सचिवालयाकडून हे नाव राज्यपालांना पाठवलं जातं. त्यानंतर राज्यपालांकडून त्या सदस्याला शपथ दिली जाते. त्यानंतर निवडून आलेल्या 287 सदस्यांना शपथ देण्याची जबाबदारी हंगामी अध्यक्षांवर असते. हा शपथविधी संपल्यानंतर विधानसभेतील सदस्यांकडून अध्यक्षांची निवड केली जाते.

@@AUTHORINFO_V1@@