भाजपचे संख्याबळ १२०वर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Oct-2019
Total Views |





मुंबई
: महायुतीचे सरकार स्थापण्यास विलंब होत असला तरी अपक्षांना सोबत घेऊन संख्याबळ वाढविण्याचे प्रयत्न राजकीय पक्षांकडून सध्या जोरात सुरू आहेत. निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने यात आघाडी घेतल्याचे चित्र आहे. आत्तापर्यंत भाजपला १४ अपक्षांनी बळ दिल्याने भाजपचा आकडा १२०वर गेला आहे. शुक्रवारी अपक्ष आमदार प्रकाश आवाडे आणि बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्यासह दोन आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. बविआने काँग्रेसची साथ सोडून भाजपला पाठिंबा दिल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.


इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना पाठिंब्याचे पत्र दिले
. तसेच बहुजन विकास आघाडीनेही भाजपला पाठिंबा दिला. बविआकडे एकूण तीन आमदार आहेत. त्यामुळे भाजपला पाठिंबा देणार्‍या आमदारांची संख्या १४ झाली असून भाजपची आमदार संख्या १२० झाली आहे. भाजपला आतापर्यंत शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील, चंद्रपूरचे किशोर जोगेवार, शाहूवाडीचे आमदार विनय कोरे, गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल, उरणचे आमदार महेश बालदी, बडनेराचे रवी राणा, बार्शीचे राजेंद्र राऊत, मीरा-भाईंदरच्या आमदार गीता जैन, गंगाखेडचे रत्नाकर गुट्टे आणि लोहाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपचे संख्याबळ १२० वर पोहोचले आहे.

@@AUTHORINFO_V1@@