पारंपरिक पेहरावात मोदींनी केले जिनपिंग यांचे स्वागत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Oct-2019
Total Views |



चेन्नई : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारतात दाखल झाले असून चेन्नईजवळील मामल्लपुरम येथे जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन्ही नेत्यांची भेट घडली. पंतप्रधान मोदींनी पारंपरिक पेहरावात जिनपिंग यांचे स्वागत केले. या अनौपचारिक भेटीस प्रारंभ करत मोदींनी जिनपिंग याना सातव्या शतकाच्या मध्यावर कोरलेल्या अर्जुनाच्या तपश्चर्येच्या भव्य वास्तूचे ऐतिहासिक महत्व सांगितले. याठिकाणी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मामल्लपुरम हे चेन्नईमधील ऐतिहासिक दर्जा असणारे शहर आहे. गेले अनेक दिवस मोदी जिनपिंग यांच्या भेटीमुळे चर्चेत आले आहे. त्यांनतर मोदी आणि जिनपिंग यांनी पंचरथ या वास्तूला यांनी भेट दिली. पंचरथ या ठिकाणाला पौराणिक महत्व आहे.





जिनपिंग यांचा हा दोन दिवसीय भारत दौरा असून या दौऱ्यात मोदी व जिनपिंग यांच्यात अनौपचारिक वाटाघाटींची दुसरी फेरी होणार आहे. दोन्ही नेते द्विपक्षीय संबंधांबाबत
; तसेच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करतील. या वाटाघाटी दोन दिवस चालणार आहेत. या मालिकेतील पहिली फेरी चीनमधील वुहान येथे गेल्या वर्षी पार पडली होती.

 
@@AUTHORINFO_V1@@