पाचोर्‍यात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची सभा

    10-Dec-2018
Total Views | 3

पाचोरा : 
 
पाचोरा तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायतची सभा नुकतीच झाली. त्यात जळगाव जिल्हाध्यक्ष विकास महाजन यांची महाराष्ट्र शासनाने राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवर शासन नामनियुक्त सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल पाचोरा अखिल भारतीय ग्राहक पंचायततर्फे या निवडीचे स्वागत करण्यात आले.
 
विकास महाजन यांचा मानिषजी काबरा, संघचालक पाचोरा व पाचोरा ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष डॉ. अनिल देशमुख यांचे हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
 
सभेत नवीन कार्यकारिणी सदस्य प्रसिद्धी प्रमुख आबासाहेब सूर्यवंशी, सदस्य व्ही. टी. जोशी, शांताराम चौधरी, महेश कौंडिण्य, सुनील पाटील, प्रवीण पाटील, योगेश पाटील, विनोद पाटील, पवन पाटील, मयूर महाजन आदी सदस्यांचा जिल्हाध्यक्ष विकास महाजन यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
 
 
यानंतर तालुकाअध्यक्ष यांनी डॉ.अनिल देशमुख म्हणाले की, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे काम सुसंवाद व समन्वयातून ग्राहकास न्याय मिळवून देण्याचे आहे.
 
त्यातूनही ग्राहकास न्याय न मिळाल्यास ग्राहक संरक्षण परिषद , ग्राहक मंच, व ग्राहक न्यायालयीन प्रक्रियेतून चालते, गेल्या सहा महिन्यात ग्राहक पंचायतीकडे विजवीतरण, वैद्यकीय क्षेत्र, बँकिंग, शेतकरी अपघात विमा, ऑनलाइन खरेदीबाबत तक्रारी प्राप्त झाल्याचे स्पष्ट केले.
 
 
तालुक्याच्या महिला संघटक आशालता राजपूत यांनीही काही ग्राहक अडचणींवर प्रकाश टाकत मनोगत व्यक्त केले. मनिष काबरा यांनीही मार्गदर्शन केले.
 
 
जिल्हाध्यक्ष विकास महाजन यांनी पाचोरा तालुक्याचे काम समाधान कारक असून लोकाभिमुख आहे. त्याबद्दल त्यांनी डॉ.अनिल देशमुख व त्यांच्या सर्व सहकार्‍यांचे मनपूर्वक अभिनंदन केले.
 
 
यावेळी तालुकाध्यक्ष डॉ अनिल देशमुख, उपाध्यक्ष अ‍ॅड. ओकेत देशपांडे ,कार्याध्यक्ष प्रा. सी. एन.चौधरी ,सचिव संजय पाटील ,तालुका संघटक गिरीश दुसाने, सहसंघटक शरद गीते, माळी समाज अध्यक्ष संतोष महाजन , सुदर्शन सोनवणे ,चिंधु मोकल , श्रीराम नाना , डॉ. प्रवीण माळी, महिला संघटक आशालता राजपूत, तालुका संघचालक मनिष काबरा ,मनिष बाविस्कर, स्वप्नील पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन तालुका संघटक गिरीश दुसाने यांनी केले. आभार सहसंघटक शरद गीते यांनी मानले.
अग्रलेख
जरुर वाचा
ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

महाराष्ट्र हे वीजनिर्मितीत भारतातील सर्वांत आघाडीचे राज्य. देशात निर्माण होणार्या एकूण विजेच्या १५ टक्के विद्युतनिर्मिती ही एकट्या महाराष्ट्रात होते. परंतु, तरीही मागणीचे प्रमाण हे वीजनिर्मितीपेक्षा जास्त असल्याने आज राज्य सरकार नवीकरणीय ऊर्जानिर्मितीवर भर देत आहे. अशातच नुकतीच राज्य सरकारने मोठी वीजदरकपात जाहीर केली. ज्यामुळे आता पुढील पाच वर्षे वीजबिल वाढणार नाही, तर कमी होणार आहे. तेव्हा राज्यातील वीज ग्राहकांना नेमका हा लाभ कसा मिळणार, यासंबंधी महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधार कंपनीचे स्वतंत्र संचालक ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121