'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

    31-Oct-2018
Total Views | 39


 


गुजरात : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४३ व्या जयंतीनिम्मित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्टॅच्यू ऑफ युनिटीचे लोकार्पण करण्यात आले. सरदार पटेल यांचा हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा ठरला आहे. देशाच्या इतिहासात आज महत्त्वाचा दिवस असल्याचे सांगत पंतप्रधान मोदींनी स्टॅच्यू ऑफ युनिटीचे बटन दाबून अनावरण केले. यावेळी त्यांनी देशाची एकता जिंदाबाद जिंदाबाद अशी घोषणा देखील दिली.

स्टॅच्यू ऑफ युनिटीचे काम २०१३ साली मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सुरू झाले होते, या पुतळ्यासाठी तब्बल २९८९ कोटी रुपये खर्च आला आहे. दरम्यान, गुजरातमधील नर्मदा परिसरात आयोजित या समारंभाला अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, तसेच अनेक नेते उपस्थित होते.


 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121