Tech भारत : 'लिनक्स' - प्रबळ, सशक्त आणि सुरक्षित ऑपरेटींग सिस्टीम

    11-Oct-2017   
Total Views | 4


 

डेटा सिक्युरिटी हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आपल्या सर्वांना आज भेडसावत आहे. जर तुम्ही याबद्दल जागरूक असाल, तुम्हाला तुमच्या सिस्टीममध्ये व्हायरस हल्ला नको असेल, लायसन्स सॉफ्टवेअरचे बिल भरून दमला असाल, सारखं कम्प्युटर स्लो होण्यापासून बचावाचा प्रयत्न करत असाल, तर एकदा लिनक्स ऑपरेटींग सिस्टीम नक्की वापरून बघा.


आजच्या काळात कम्प्युटर युझर्सची लक्षावधींच्या संख्येत दररोज वाढ होत असते. अशावेळी सुरक्षिततेची जबाबदारी देखील वाढली आहे. अधिकाधिक युझर्स कसे सुरक्षितपणे कम्प्युटर प्रणाली हाताळू शकतील यावर आजचे आयटी क्षेत्र काम करत आहे. अश्या काळात लिनक्स ऑपरेटींग सिस्टीमचा वाढता वापर यासर्वांवर रामबाण उपाय होऊ शकतो. त्यामुळे लिनक्सबद्दल माहिती करून घेणे अधिक महत्वाचे ठरते.

 

काय आहे लिनक्स?

लिनक्स ही ओपन सोर्स तंत्रज्ञानातील प्रसिद्ध ऑपरेटींग सिस्टीम आहे. याचा वापर प्रत्येक कम्प्युटर युझर्सने प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष स्वरुपात केला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. जगातील ७० टक्के पेक्षा जास्त वेबसाईट या, लिनक्स सर्व्हरवर चालत आहेत. त्याचबरोबर अॅन्ड्रॉईडसारखी मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम देखील लिनक्स कर्नलच्या आधारावर विकसित झाली आहे.


युनिक्स या ऑपरेटींग सिस्टीमला पर्याय म्हणून लिनक्स ऑपरेटींग सिस्टीम १९९१ च्या काळात विकसित करण्यात आली. लिनस टोरवाल्ड या अमेरिकी सॉफ्टवेअर इंजिनीअरने लिनक्स विकसित केली. लिनसच्या नावातील पहिले दोन अक्षर आणि युनिक्सचे शेवटचे अक्षर असे मिळून या ऑपरेटींग सिस्टीमला 'लिनक्स' असे नाव देण्यात आले आहे.


लिनक्स ऑपरेटींग सिस्टीम ही सर्वांसाठी मोफत उपलब्ध आहे. लिनक्स वापरणाऱ्या युझर्सना पैसे मोजावे लागत नाहीत. त्याचबरोबर यातील तंत्रज्ञानाचा वापर करून स्वत:ची वेगळी ऑपरेटींग सिस्टीमसुद्धा तयार करता येते. यात तंत्रज्ञानाची माहिती असलेले डेव्हेलपर्स आपले योगदान देखील देऊ शकतात. लिनक्सच्या आधारावर रेड हॅट सारखे बलाढ्य फोरम उभे राहिले आहेत.


उबंटू लिनक्स लूक

 

लिनक्स डीस्ट्रीब्यूशन

आज माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात लिनक्सची विविध रूपे बघायला मिळतात. विविध फोरम्सनी लिनक्सची विविध व्हर्जन विकसित केली आहेत, त्यालाच लिनक्स डीस्ट्रीब्यूशन म्हटले जाते. अगदी जुन्या युझर पासून ते नवीन कम्प्युटर प्रणाली हाताळणाऱ्या प्रत्येक युझरसाठी लिनक्सची विविध स्वरूपे उपलब्ध आहेत. हे सर्व लिनक्स व्हर्जन्स आपण आपल्या कम्प्युटरमध्ये इंस्टॉल करू शकता.

उबंटू लिनक्स

लिनक्स मिंट

आर्च लिनक्स

डीपीन

फेडोरा

डेबीअन

ओपनसूस

 

या प्रत्येक व्हर्जन्सचे स्वरूप वेगवेगळे आहे. काही व्हर्जन अधिक ग्राफिकल दृष्टीने विकसित केले गेले, तर काही अगदी जुन्या पद्धतीने विकसित करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक कम्प्युटर युझर्सला यातून बरेच काही मिळत असते.

 

सिक्युरिटी फीचर्स

पासवर्ड, फाईल डीस्ट्रीब्यूशन, गृप प्रणाली, फायरवॉल यांसारखे प्रबळ सुरक्षेचे पर्याय लिनक्समध्ये उपलब्ध आहेत. याशिवाय लिनक्स ऑपरेटींग सिस्टीम, ही मालवेअरमुक्त आहे, तसेच यात व्हायरस देखील प्रभावीपणे काम करू शकत नाही. याचे महत्वाचे कारण म्हणजे, यात कुठलीही फाईल सेव्ह होत असताना एक्झिक्युटेबल फाईल म्हणून सेव्ह होत नसून, ती पॅकेजच्या स्वरुपात सेव्ह होत असते. त्यामुळे कुठलीही व्हायरस अथवा मालवेअर फाईल एक्झिक्युटेबल कमांडशिवाय रन होत नाही, आणि परिणामी व्हायरसचा प्रभाव कुठल्याही इतर सॉफ्टवेअरवर पडत नाही.

 

काही महत्वपूर्ण लिंक्स

लिनक्स वापरताना अनेक प्रश्न आपल्या समोर पडू शकता, अथवा त्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंक आपणास त्याबद्दल अधिकृत माहिती देतील.

Linux.com

Linux.org

Linux Documentation Project

Linux Knowledge Base and Tutorial

 

- हर्षल कंसारा

हर्षल कंसारा

माहिती तंत्रज्ञानातून अभियांत्रिकी पदवीधर, वेब अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट क्षेत्रात कामाचा अनुभव, सॉफ्टवेअर बरोबरच लेखनात ही विशेष आवड, ब्लॉग लेखन, चालू घडामोडी, राजकारण, सामाजिक आणि तरुणाईशी संबंधित विषयांवर लिखाणाची आवड, मराठी बरोबरच गुजराती आणि इंग्रजी साहित्यात देखील रुची, रा.स्व. संघाचे स्वयंसेवक.

अग्रलेख
जरुर वाचा
ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

महाराष्ट्र हे वीजनिर्मितीत भारतातील सर्वांत आघाडीचे राज्य. देशात निर्माण होणार्या एकूण विजेच्या १५ टक्के विद्युतनिर्मिती ही एकट्या महाराष्ट्रात होते. परंतु, तरीही मागणीचे प्रमाण हे वीजनिर्मितीपेक्षा जास्त असल्याने आज राज्य सरकार नवीकरणीय ऊर्जानिर्मितीवर भर देत आहे. अशातच नुकतीच राज्य सरकारने मोठी वीजदरकपात जाहीर केली. ज्यामुळे आता पुढील पाच वर्षे वीजबिल वाढणार नाही, तर कमी होणार आहे. तेव्हा राज्यातील वीज ग्राहकांना नेमका हा लाभ कसा मिळणार, यासंबंधी महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधार कंपनीचे स्वतंत्र संचालक ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121