कल्याणमधील एका रुग्णालयातील रिसेप्शनिस्ट तरूणीला मारहाण केल्याप्रकरणी गोकुळ झा याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेचा एक नवा व्हिडीओ पुढे आला असून यात आता नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे. यामध्ये त्या तरुणीने आरोपीच्या वहिनीच्या कानाखाली मारल्याचे दिसत आहे.
Read More
कल्याणमधील एका रुग्णालयातील रिसेप्शनिस्ट तरूणीला मारहाण केल्याप्रकरणी गोकुळ झा याला मंगळवार, २३ जुलै रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान, त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून त्याने न्यायालयातही अरेरावी केल्याची माहिती पुढे आली आहे.
‘डॉक्टराकडे एमआर बसले आहेत तुम्ही जरा थांबा’ असे रुग्णालयातील रिसेप्शनिस्ट तरूणींनी उच्चरताच परप्रांतीय तरूणाने त्या तरूणीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना शहराच्या पूर्व भागातील बालचिकित्सालय रुग्णालयात सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. रिसेप्शनिस्ट मराठी तरूणीला मारहाण करणाऱ्या तरूणाचे नाव गोकूळ झा असे आहे. त्याच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोकूळ झा या तरुणाचा शोध पोलिस घेत आहेत.
निसर्ग संवर्धन आणि स्वच्छतेची जाणीव असलेल्या श्री विठोबा-रुक्मिणीच्या भक्तीवर आधारित ज्ञान दिंडी रविवारी सकाळी काढण्यात आली होती. निमित्त होते ते आषाढी एकादशी चे.
कोलकाता लॉ कॉलेजच्या कॅम्पसमध्ये २४ वर्षीय कायद्याच्या विद्यार्थिनीवर झालेल्या क्रूर सामूहिक बलात्कारामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेची दखल म्हणून, सर्वोच्च न्यायालयाचे वकील सत्यम सिंह राजपूत यांनी भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांना खुले पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो घ्यावा आणि कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय मुक्त आणि निष्पक्ष चौकशी सुनिश्चित करण्यासाठी न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशीचे आदेश द्यावेत, अशी विनंती केली.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बारावे आणि माेहिली जलशुद्धीकरण केंद्रातील पंप जुने झाले आहेत. त्यामुळे नागरीकांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्याचा त्रास नागरीकांना सहन करावा लागतो. हे पंप दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे केली आहे.
नुकताच कोलकाता येथे विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनीवर बलात्कार झाला. भाजप, हिंदू आणि प्रभू श्री रामचंद्रांविरोधात गरळ ओकणार्या प. बंगालच्या मुख्यमंत्री या भयंकर घटनेबाबत मूग गिळून बसल्या आहेत. कारण, सामूहिक बलात्कार करणारे तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचे नेते आहेत.‘मा,माटी आणि मानूष’चा नारा देत, प्रत्यक्षात त्याविरोधात राज्य चालवणार्या ममता बॅनर्जींच्या सत्तेचे जंगलराज जगासमोर उघडे पडले आहे. या घटनेचा घेतलेला हा आढावा...
एमएमआरडीएच्या बैठकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचना कल्याण रिंग रोड टप्पा - २च्या आरेखनात बदल करण्याचा महत्वाचा निर्णय डोंबिवलीसह कल्याण आणि टिटवाळा या कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातल्या शहरांना जोडण्यासाठी आणि गतीमान प्रवास सहज व्हावा यासाठी उभारला जाणारा महत्वाकांक्षी कल्याण रिंग रोड प्रकल्पाला गती देण्यासाठी त्याच्या टप्पा - २ मध्ये आरेखनात बदल करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतला आहे. टप्पा - २ या शीळ रस्ता ते मोठागाव पर्यंतच्या टप्प्यात अनेक ठिकाणी भूसंपादन करावे
कल्याण रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक पाचवरुन दोन गांजा तस्करांना कल्याण रेल्वे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या गांजा तस्करांची नावे मेहताब शेख आणि लाल कोटकी अशी आहे. यापैकी मेहताब हा मुंब्रा शीळ परिसरात राहतो. तर लाल हा कर्नाटकातील कुलबर्गी येथे राहणारा आहे. या दोघांकडून ४ लाख १७ हजार ३६० रुपये किंमतीचा गांजा पोलिसांनी हस्तगत केला आहे.
कल्याण डोंबिवली शहरात आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शहर स्वच्छता अभियान राबविले जात आहे, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. प्रत्येक शहराची ओळख ही त्या शहरातील स्वच्छतेवरून होते. त्यामुळे हे अभियान कल्याण डोंबिवली शहराच्या स्वच्छतेचे एक नवे पर्व असून या अभियानामुळे ही दोनही शहरे राज्यातीलच नव्हे तर देशातील स्वच्छ शहरे म्हणून नावारुपास येतील, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
( Unique initiative of Kalyan Fire Department ) आग लागल्यास कसा बचाव करावा, कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत कल्याण अग्निशमन दलाच्यावतीने कल्याण पश्चिमेतील शाळेत विद्यार्थ्यांना अग्निसुरक्षा प्रशिक्षण देण्यात आले.
आजची पिढी ही मोबाईलच्या युगात वावरणारी. तेव्हा, हिंदू धर्मातील सण, संस्कृती आणि परंपरा यांची नवीन पिढीला माहिती व्हावी आणि एक सशक्त समाज निर्माण व्हावा, यासाठी बालसंस्कार वर्गाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्या हेमा नरेंद्र पवार कार्यरत आहेत. त्यांच्याविषयी...
मुलांनी इंग्रजीवर प्रभुत्व मिळवायचे असेल तर दररोज १५ मिनिटे वृत्तपत्राचे वाचन केले पाहिजे. त्यातून नवीन शब्द समजतात, असा सल्ला कडोंमपाच्या आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांनी विद्यार्थ्यांना दिला.
पावसापाण्यावर चाललेला पिकांवरचा संवाद आपल्याला जुनाच! पण ‘पावसाचा परिणाम उत्पादनावर फारसा होणार नाही,’ हे कधीतरी ऐकू येईल का? तर तशी शक्यता नाकारता येत नाही. भारतातील शेतीविषयक आमूलाग्र बदल वर्तवलेला ‘अन्नटंचाई ते धान्यसंपन्नता’ अशा आशयाचा एक अहवाल नुकताच प्रकाशित झाला; त्याचेच हे आकलन...
मागील दोन दशकांहून अधिक काळ धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेरपासून 25 किमी अंतरावर वसलेल्या बारीपाड्याचा चेहरामोहरा बदलणार्या ‘वनवासी कल्याण आश्रमा’च्या चैत्राम पवार यांना कालच भारत सरकारचा मानाचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला. नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि लोकसहभागातून शाश्वत विकास साधत, बारीपाड्याची एक आदर्श आणि स्वावलंबी गाव म्हणून ओळख त्यांनी निर्माण केली. काही वर्षांपूर्वीच चैत्राम पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन बारीपाड्याची ही यशोगाथा जवळून अनुभवण
मुंबई आणि महानगरात सुरु असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची कायमच नवनवीन विक्रम रचले आहे. अशावेळी कल्याण-तळोजा या मेट्रो १२ मार्गाच्या कामादरम्यान एक अनोखा विक्रम रचण्यात आला आहे. देशातील सर्व महानगरांमध्ये सुरु असणाऱ्या मेट्रो कामांमध्ये मेट्रो १२ने डिसेंबर या केवळ एका महिन्यात ३७ पाइल कॅप उभारण्याचा अनोखा विक्रम केला आहे. देशभरात आजपर्यंतचा विक्रम हा ३५ पाइल कॅप उभारून करण्यात आला आहे, असा अंदाज हा विक्रम शेअर करत सोशलमिडीया शेअरकर्त्यानी वर्तविला आहे.
(Adv. Ujjwal Nikam) कल्याण पूर्व परिसरात एका १२ वर्षीय मुलीची अत्याचार करून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून, पीडितेची बाजू मांडण्याची जबाबदारी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावर देण्यात आली आहे. तसेच ठाणे पोलीस आयुक्तांना ३० दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पीडित मुलगी माझ्या मुलीसारखी आहे. त्यामुळे तिला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी माझी आहे. दोषींना ४ महिन्यांत कठोर शिक्षा दिली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगित
कल्याणमधील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीसह त्याची पत्नी साक्षी गवळी यांना २ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुरुवारी या दोन्ही आरोपींना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांच्या दालनात याप्रकरणाची सुनावणी पार पडली.
कल्याणमधील घटनेतील आरोपी विशाल गवळी याला फाशीच होणार असून आम्ही सर्वजण त्याचा पाठपुरावा करणार आहे, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार चित्रा वाघ यांनी दिली. गुरुवार, २६ डिसेंबर रोजी त्यांनी अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी माहिती घेतली. तसेच पीडित कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
कल्याण : कल्याणमध्ये ( Kalyan Case ) मराठी कुटुंबाला केलेल्या मारहाण प्रकरणी प्रमुख आरोपी अखिलेश शुक्ला, त्याची पत्नी गीता शुक्ला आणि इतर चार आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या सहा आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सुनावणी दरम्यान आरोपींच्या वकिलांनी प्रांतवादाचा रंग देऊन परिस्थिती अधिक चिघळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा युक्तिवाद केला. तर दुसरीकडे, फिर्यादींच्या वकिलांनी या घटनेवर कठोर भूमिका घेत न्यायाची मागणी केली आहे.
नागपूर : कल्याण ( Kalyan ) येथील सोसायटीमध्ये मराठी माणसांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई ही मराठी माणसांची आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. २० डिसेंबर रोजी विधानपरिषदेत दिली.
नवी दिल्ली : पश्चिम बंगाल सरकारने ( Mamta Govt. ) ‘मनरेगा’ योजनेचा लाभ अपात्रांना दिल्याचा घणाघात केंद्रीय कृषी आणि ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंगळवारी लोकसभेत केला आहे.
नवी दिल्ली : हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आहे. त्यामुळे आता ‘इंडी’ आघाडीचे ( INDI Allience ) नेतृत्व करण्यासाठी सक्षम नेत्याची गरज आहे, असे सांगून तृणमूल काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर शंका व्यक्त केली आहे.
गेल्या आठवड्यात वन विभागाने कल्याणमध्ये वन्यजीव तस्करीमधून पकडलेल्या ओरॅंगुटॅनला (kalyan orangutan) मूळ देशात पाठवण्याचे आदेश वन्यजीव विभागाने दिले आहेत. सध्या या प्राण्याची रवानगी नागपूर येथील गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात करण्यात आली असून या प्राण्याला मूळ देशात पाठवण्याची तयारी वन विभाग करत आहे. (kalyan orangutan)
(CM Eknath Shinde) “महाविकास आघाडीच्या सरकारने त्यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्राला अधोगतीकडे नेण्याचे काम केल्यानेच आम्ही हे महाराष्ट्रविरोधी सरकार उलथवून टाकले,” अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. तसेच, “या सभेला झालेली प्रचंड गर्दी पाहाता महायुतीच्या उमेदवाराचा विजय निश्चित आहे,” असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.
Rajesh More : डोंबिवलीचे शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांना येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती तर्फे कल्याण ग्रामीण मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. आपल्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेची उमेदवारी दिली आहे, त्यांचा विश्वास सार्थ ठरविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वन विभागाने कल्याणमधील पलावा सिटीमधील एका इमारतीमध्ये शनिवारी छापा टाकून विदेशी प्राण्यांची तस्करी उघडकीस आणली होती (kalyan exotic animal). या छाप्यामधून काही देशी प्राण्यांसह ओरॅंगोटॅनसारख्या विदेशी प्राणी ताब्यात घेतले होते (kalyan exotic animal). या घटनेतील आरोपी अजूनही फरार असून वन विभागाचे अधिकारी त्याच्या मागावर आहेत (kalyan exotic animal). मात्र, यानिमित्ताने कल्याण, ठाणे, मुंब्रा परिसरात चालणाऱ्या विदेशी प्राण्यांच्या बेकायदा खरेदी-विक्रीचे जाळे उघडकीस येण्यास सुरुवात झाली आहे. (kalyan exotic animal
कल्याण पूर्वच्या विकासाचा एकच ध्यास! शहरातील पाणी प्रश्न, महिला सुरक्षिततेसाठी पोलिस चौकी, सुपर स्पेशालिटी रुग्णालय करणार!, कल्याण पूर्वच्या महायुती उमेदवार सुलभा गायकवाड ( Sulabha Gaikwad ) यांचे आश्वासन
कल्याण : “कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती ही अभेद्यच असल्याचे आश्वासक असे चित्र आज दिसले. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, रिपाइं, लहुजी सेना महायतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या खांद्याला खांदा लावत भाजप नेते नरेंद्र पवार हे निवडणूक प्रचारात सहभागी झाल्याचे दिसून आले. महायुती ही अभेद्यच असल्याचे सूतोवाच महायुती उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी केले. तर विश्वनाथ भोईर यांच्या विजयासाठी आपण संपूर्ण ताकद पणाला लावू,” असा निर्धार यावेळी नरेंद्र पवार ( Narendra Pawar ) यांनी व्यक्त केले.
‘वनवासी कल्याण आश्रम’ आणि कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा वसा पुढे नेणार्या नाशिकच्या युवा कीर्तनकार अश्विनी हिरामण चौधरी यांच्याविषयी...
गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी केली चर्चा 15 डब्यांच्या गाड्या, महिला विशेष लोकल Kalyan Ladies Special Local सोडण्याची केली मागणी.
क्फ सुधारणा विधेयकाविषयीच्या संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) बैठकीत मंगळवारी राडा झाला. जेपीसीचे सदस्य आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी अश्लील शब्दांचा वापर करून अध्यक्षांच्या दिशेने काचेची बाटली फोडून फेकल्याचे गंभीर कृत्य केले आहे.
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो कोणी उमेदवार देतील त्याचे आम्ही प्रामाणिकपणे काम करणार असल्याची ग्वाही शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे.
Narendra Modi यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत २०२८ वर्षापर्यंत मोफत तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील सुमारे ८० कोटी लोकसंख्येस प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनासह इतर योजनांतर्गत तांदूळ मिळणार आहे. नरेंद्र मोदींनी बुधवारी ९ ऑक्टोबर २०२४ रोजी ही घोषणा केली आहे.
आपल्यासाठी पक्षादेश शिरसावंद्य असून कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा आमदार असल्याने ही जागा शिवसेनेलाच जाईल. याठिकाणी आपण स्वतःच प्रमुख दावेदार असल्याचे सूतोवाच आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले आहे.
कल्याण ग्रामीणमधील पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. लोकसभा निवडणूकीच्या दोन महिन्या आधी जशी जादू दाखवून पाणी पुरवठा करण्यात आला. तीच जादू आत्ता दाखवा. पाण्याच्या बाबती एमआयडीसी चालूगिरी करीत आहे. अधिवेशन संपल्यावर आम्हालापण काही काम नाही. पाणी प्रश्न सुटला नाही तर एमआयडीसीवर विशाल मोर्चा काढू असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी दिला आहे.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त दि.१ जुलै रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हुतात्मा बाबू गेनू मुबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई येथे सकाळी १०.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येईल.
कल्याण पूर्वेच्या रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगर्स, आयुर हॉस्पिटल अणि रिक्षा चालक मालक असोसिएशन ( सिद्धार्थ नगर) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात शहरातील सुमारे ११० रिक्षाचालकांनी आरोग्य तपासणी चा लाभ घेतला.
राज्यात लोकसभा निवडणूकांची रणधूमाळी सुरु असताना उबाठा गटाने नुकतीच चार उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात कल्याण लोकसभा मतदारसंघातून वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना ते उबाठा गट व्हाया मनसे असा प्रवास करणाऱ्या वैशाली दरेकर कोण आहेत? हे जाणून घेऊया.
लोकसभा निवडणूका तोंडावर आल्या असून राज्यात सर्वच पक्षांचे जागावाटप सुरु आहे. यातच आता कल्याण लोकसभेसाठी उबाठा गटाकडून केदार दिघेंच्या नावाची चर्चा सुरु आहे. केदार दिघे यांना कल्याणमधून लोकसभेचे तिकीट मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
"आज एमएमआरमधील अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या Mumbai Metro 12 मेट्रो मार्गिकेच्या कामांचा शुभारंभ आम्ही करत आहोत. या मेट्रोच्या कार्यान्वयनानंतर मुंबई, ठाणे, नवीमुंबई या भागांसाठी व्यावसायिक वाढीस उत्प्रेरक ठरणार असून प्रगतीची एक नवी दिशा नागरिकांना मिळणार आहे.
प्रभू श्रीरामांच्या अयोध्येतील भव्य मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर देशाच्या कानाकोपऱ्यात दिवाळी साजरी होत आहे. या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याणचा ऐतिहासिक भगवा तलाव आज तब्बल 50 हजार दिव्यांनी उजळून निघाल्याचे दिसून आले. कपिल पाटील फाउंडेशन आणि भाजप शहराध्यक्ष वरुण पाटील यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमात हजारो रामभक्त सहभागी झाले होते.
उद्धव ठाकरे आज १३ जानेवारीला कल्याण डोंबीवलीच्या दौऱ्यावर आहे. कल्याण डोंबिवलीतील उबाठा गटाच्या शाखांना ते भेट देणार आहेत. कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. उद्धव ठाकरेंच येथे स्वागत आहे अस ते यावेळी म्हणाले.
आज दि. २६ डिसेंबर म्हणजे ‘वनवासी कल्याण आश्रमा’चे संस्थापक अध्यक्ष वनयोगी रमाकांत केशव देशपांडे उपाख्य बाळासाहेब देशपांडे यांची जयंती आणि ‘वनवासी कल्याण आश्रमा’चा स्थापना दिन. त्यानिमित्ताने बाळासाहेबांनी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून उभारलेल्या समाजहित, राष्ट्रहिताला समर्पित कार्याचे स्मरण करणे औचित्यपूर्ण ठरावे.
राजकारणात विरोधकांनी एकमेकांच्या नकला करणे, हे जनतेच्याही म्हणा आता चांगलेच अंगवळणी पडलेले. अगदी बाळासाहेबांपासून ते राज ठाकरेंपर्यंत महाराष्ट्राच्या राजकीय व्यासपीठांवरील नकलांनी खोचक राजकीय टिप्पण्या आणि एकमेकांना रीतसर चिमटेही काढले. नक्कलच काय तर व्यंगचित्रांच्या फटकार्यांतूनही बाळासाहेबांनी राजकीय विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. पण, नक्कलबाजीतून होणारी ही राजकीय शेरेबाजी नेमकी कोणाची, कुठे आणि कोणासमोर करावी, हेही तितकेच महत्त्वाचे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना फोन करून त्यांच्या अपमानाबद्दल शोक व्यक्त केला आहे. गेल्या दोन दशकांपासून अशा अपमानाचा सामना करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी ही दुःखद घटना असल्याचे म्हटले आहे. उपाध्यक्ष जगदीप धनखड यांनी हा त्यांच्या शेतकरी पार्श्वभूमीचा आणि जाट समाजाचा अपमान असल्याचे म्हटले होते. दि.१९ डिसेंबर २०२३ रोजी विरोधी खासदारांनी संसदेबाहेर उपराष्ट्रपतींची नक्कल केली होती आणि त्यांची खिल्ली उडवली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही या प्रकरणावर शोक व्यक्त
राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची मिमिक्री करणारा व्हिडिओ संसदेत बनवल्याच्या वादावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निलंबित झालेले विरोधी पक्षाचे खासदार संसदेच्या पायरीवर निदर्शने करत होते. यावेळी तृणमुल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी हे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची लज्जास्पद पद्धतीने थट्टा करताना दिसले. तर काँग्रेस नेते राहुल गांधी हे त्यांचे व्हीडिओ शुट करण्यात व्यस्त होते आणि इतर खासदार हसत मजा घेत होते.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा झालेला अपमान हा अतिशय गंभीर आहे. लोकप्रतिनिधींच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यास शिष्टाचाराचे बंधन हवे, असे मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी व्यक्त केले आहे.तृणमूल काँग्रेस खासदार कल्याण बॅनर्जी यांनी संसदेच्या पायऱ्यांवर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केली होती. त्यावेळी काँग्रेस खासदार राहुल गांधी हे हसून त्या प्रकाराचे आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करत होते. या प्रकाराचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी निषेध
घमंडिया युतीची कृती देशासाठी अत्यंत लज्जास्पद आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर संताप व्यक्त केला आहे. मंगळवारी लोकसभेतून विरोधी पक्षांच्या ७९ खासदारांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर तृणमुल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. यामध्ये त्यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची नक्कल केली. विशेष म्हणजे काँग्रेस नेते राहूल गांधीनी त्यांचा व्हिडीओ बनवला.
आदित्य ठाकरे हे कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे अशी चर्चा सुरू असताना राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. पण आता या मुद्द्यावर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आपले मौन सोडले आहे आणि थेट आदित्य ठाकरेंना कुठून उभे राहायचे आहे असा सवाल उपस्थित करत एका प्रकारे आव्हान दिले आहे.