शहराचा विकास हा एकच ध्यास : सुलभा गायकवाड

    10-Nov-2024
Total Views | 22
Sulabha Gaikwad

कल्याण : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे भाजपच्या उमेदवार सुलभा गणपत गायकवाड या निवडणूक लढवत आहेत. कल्याण शहरातील पूर्व विभागात येत्या काळात सुपर स्पेशालिटी रुग्णालय, महिला सुरक्षेसाठी पोलीस चौकी, सुसज्ज रस्ते आदी विकासकामांसह महिला सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण देण्याचा मानस आहे. तसेच शहराचा विकास हा एकच ध्यास असल्याचे सुलभा गायकवाड ( Sulabha Gaikwad ) यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या प्रतिनिधी बरोबर बोलताना सांगितले.

यंदाची ही निवडणूक वेगळी आहे. गणपत गायकवाड हे दोनदा अपक्ष आणि एकदा भाजपमधून निवडून आले आहेत. तुमचे विजयाचे नियोजन कसे आहे?

- निवडणूक ही निवडणुकीसारखीच असते. कोणीतीही निवडणूक सोपी नसते. पण, कार्यकर्ते त्या निवडणुकीला सोपी करीत असतात. आमदार गणपत गायकवाड यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. गायकवाड साहेबांच्या अनुपस्थितीत मी प्रथमच घराबाहेर पडले आहे. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी विकासकामांची धरलेली कास आणि गायकवाड साहेबांनी मतदार संघात केलेली कामे, यावरून महायुतीचा विजय निश्चित आहे.

निवडणुकीला प्रथमच सामोरे जात आहात, हा अनुभव कसा आहे?

- मी एक गृहिणी आहे. गायकवाड साहेबांच्या अनुपस्थितीत माझ्यावर ही जबाबदारी आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मला ही संधी दिली आहे, या संधीचे मी नक्कीच सोने करीन. भाजपसह महायुतीतील प्रत्येकाची साथ मिळत आहे. त्यामुळे प्रवास सोपा होत आहे. खूप चांगला अनुभव येत आहे.

महायुतीची पहिली सार्वत्रिक निवडणूक आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून कसा पाठिंबा मिळत आहे? तसेच महायुतीतील इतर घटक पक्षांचा पाठिंबा कसा आहे?

- शिवसेनेसह महायुतीतील सर्वच घटक पक्षांचा चांगला पाठिंबा मिळत आहे. सर्वजण प्रचारात उतरले आहे आणि जोरदार प्रचार सुरू आहे.

कल्याण पूर्वेला शासकीय पातळीवर नेहमीच सापत्न वागणूक मिळते. आ. गायकवाड यांनी नेहमी खंत व्यक्त केली आहे. महापालिकेत कल्याण पूर्वेतील नगरसेवकांनी मागणी केली होती. सुविधा मिळत नव्हत्या. तर हा भाग महापालिकेतून वगळावा. महापालिका स्तरावरील कामे होत आहेत का?

- स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नेहमी जनता दरबाराचे आयोजन केले आहे. त्यामुळे मतदार संघातील वॉटर, मीटर आणि गटर, ही महापालिकेची कामे आहेत. गणपत गायकवाड यांनी महापालिका प्रशासनावर नेहमी अंकुश ठेवत लोकांची कामे करून घेण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.

निवडणूक कोणत्या अजेंड्यावर लढत आहात?

- कल्याण पूर्वेत सुपर स्पेशालिटी रुग्णालय, सुसज्ज रस्ते, महिला सक्षमीकरण या मुद्यावर निवडणूक लढवित आहे आणि सध्याच्या महायुती सरकारचा जो अजेंडा आहे, तोच आमचा अजेंडा आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
मल्टीस्टारर ‘अभंग तुकाराम’ चित्रपटातून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची जीवनगाथा

मल्टीस्टारर ‘अभंग तुकाराम’ चित्रपटातून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची जीवनगाथा

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांना मानणारा मोठा वारकरी सांप्रदाय महाराष्ट्रभर आहे. तुकाराम महाराजांचं संतसाहित्य देखील पार मोठं आहे. यावरुनच संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आजपर्यंत बरेच चित्रपट मालिका येऊन गेले आहेत. तर अभंग तुकाराम हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतीच या चित्रपटाच्या टीमने देहूला या ठिकाणी भेट दिली. ‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ असा अखंड नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर... अशा भक्तिमय वातावरणात अवघी देहूनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. जगद्गुरू संत तुकाराम महाराज..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121