उपराष्ट्रपतींची मिमिक्री प्रकरणी राहुल गांधींनी मौन सोडले!

    20-Dec-2023
Total Views | 325

Rahul Gandhi 
 
 
नवी दिल्ली : राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची मिमिक्री करणारा व्हिडिओ संसदेत बनवल्याच्या वादावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निलंबित झालेले विरोधी पक्षाचे खासदार संसदेच्या पायरीवर निदर्शने करत होते. यावेळी तृणमुल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी हे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची लज्जास्पद पद्धतीने थट्टा करताना दिसले. तर काँग्रेस नेते राहुल गांधी हे त्यांचे व्हीडिओ शुट करण्यात व्यस्त होते आणि इतर खासदार हसत मजा घेत होते.
 
 
राहुल गांधी म्हणाले, "अपमान कोणी केला? खासदार तिथे बसले होते, मी त्यांचा व्हिडिओ शूट केला. व्हिडिओ माझ्या फोनवर आहे. मीडिया ते दाखवत आहे. कोणीही काही बोलले नाही. आमच्या 150 खासदारांना हाकलून दिले आहे, पण मीडियात त्यावर कोणतीही चर्चा झालेली नाही. अदानीवर चर्चा नाही, राफेलवर चर्चा नाही, बेरोजगारीवर चर्चा नाही. आमचे खासदार निराश होऊन बाहेर बसले आहेत." असं ते म्हणाले.
 
 
22 डिसेंबरला आंदोलन!
 
खासदारांच्या निलंबनाचा मुद्दा विरोधी पक्षांच्या आघाडीने उचलून धरला आहे. मंगळवारी दिल्लीत झालेल्या महाआघाडीच्या बैठकीत या मुद्द्यावर २२ डिसेंबरला देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. आघाडीच्या बैठकीनंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, आघाडी पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आपला निषेध नोंदवतील आणि सरकारकडे निलंबन मागे घेण्याची मागणी करतील.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121