कल्याणमध्ये उबाठाकडून आनंद दिघेंच्या पुतण्याला उमेदवारी?
23-Mar-2024
Total Views | 69
मुंबई : लोकसभा निवडणूका तोंडावर आल्या असून राज्यात सर्वच पक्षांचे जागावाटप सुरु आहे. यातच आता कल्याण लोकसभेसाठी उबाठा गटाकडून केदार दिघेंच्या नावाची चर्चा सुरु आहे. केदार दिघे यांना कल्याणमधून लोकसभेचे तिकीट मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
महायूतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे कल्याणमधून लोकसभा लढवणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता उबाठा गटाकडून कट्टर शिवसैनिक असलेले दिवंगत आनंद दिघे यांचे सख्खे पुतणे केदार दिघे यांना कल्याणमधून लोकसभेची उमेदवारी देण्याची चर्चा सुरु आहे.
दुसरीकडे, उत्तर मुंबईतून ठाकरे गटाचे माजी नगरसेवक दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांना लोकसभेचे तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर महायूतीकडून उत्तर मुंबईमध्ये भाजपचे नेते पीयूष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.