हेच दौरे आधी केले असते तर ...; श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

    13-Jan-2024
Total Views | 40
thakrey shinde
 
मुंबई : उद्धव ठाकरे आज १३ जानेवारीला कल्याण डोंबीवलीच्या दौऱ्यावर आहे. कल्याण डोंबिवलीतील उबाठा गटाच्या शाखांना ते भेट देणार आहेत. कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. उद्धव ठाकरेंच येथे स्वागत आहे अस ते यावेळी म्हणाले.
 
श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचे स्वागत करतानाच हेच दौरे आधी केले असते तर आज परीस्थीती वेगळी असती असा टोलाही लगावला आहे. उद्धव ठाकरे आज साधारण सात ते आठ तास या मतदारसंघाला देणार आहेत. त्यांच कल्याण मध्ये स्वागत आहे पण इतका वेळ जर आधी पक्षासाठी दिला असता तर आज परिस्थीती वेगळी असली असती अस ते म्हणाले.
 
शिवसेना एकनाथ शिंदेंचीच असा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिल्यानंतर आता आगामी लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने सर्वच पक्षानी तयारी सुरु केली आहे. उद्धव ठाकरे ही संजय राऊत यांच्या समवेत आज कल्याण डोंबिवली च्या दौऱ्यावर गेले आहेत.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121