Tech Wari

इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी घेतली भेट

खालापूर मधील इर्शाळगड येथील इर्शाळवाडीवर दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली.त्यात २७ जणांचा मृत्यू झाला असून ढिगाऱ्याखाली अद्याप ५० लोक दबले असल्याची शक्यता आहे. या दुर्घटनास्थळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट देऊन पाहणी केली. इर्शाळगड वर निमुळता रस्ता असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला खोल दरी आहे. पाऊस येथे सुरू असून चिखल आणि धुके असल्याने मदतकार्यात अनंत अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे येथे वायरलेस संदेशवर मदतकार्याची माहिती रामदास आठवले यांनी घेतली.

Read More

इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्तांना जुई गडकरीचा मदतीचा एक हात

रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या इर्शाळवाडी गावावर बुधवारी दरड कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. इर्शाळवाडीत गेल्या दोन दिवसांपासून बचावकार्य सुरु आहे. अजूनही काही गावकरी ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवली आहे. या दुर्घटनेबाबत अनेकांनी हळहळ व्यक्त केली. यात अनेक कलाकारांनीही त्यांच्या भावना समाज माध्यमातून व्यक्त केल्या. अभिनेत्री जुई गडकरीने सुद्धा या संदर्भात पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केले होते. आता अभिनेत्रीने पुढाकार घेत येथील ग्रामस्थांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. जुईची टी

Read More

उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे घडलेल्या घटनेनंतर राज्यभरातून पीडितांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. राज्यातील सेवाभावी संस्था , काही सेलिब्रिटी आणि इतर मान्यवरांनी बाधितांना मदत देऊ केली आहे. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील कर्मचारीही पीडितांसाठी धावून आले आहेत. फडणवीसांच्या उपमुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी इर्शाळवाडी घटनेतील पीडितांच्या मदतीसाठी फडणवीसांच्या जन्मदिनाच्या औचित्यावर एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

वानखेडेंना बडतर्फ करा : मुंबई उच्च न्यायालयात याचिका

केंद्रीय नोकरी मिळवण्यासाठी अनुसूचित जातीचे (एससी) खोटे जातीचे दावे केल्याबद्दल एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांना नागरी सेवांमधून बडतर्फ करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत करण्यात आली आहे. खंडणीचे आरोप समोर येण्यापूर्वी, समीर वानखेडे शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासोबत असलेल्या क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत होता. नंतर हे प्रकरण दिल्लीतील एनसीबीच्या विशेष तपास पथकाकडे देण्यात आले.याचिकेनुसार, वानखेडेने तो मुस्लिम असल्याचे लपवले. तो मुस्लिम पालक दाऊद आणि जाहिदा

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121